गावगाथा

श्री.वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा आरती संपन्न.

श्री.वटवृक्ष मंदीराच्या वतीने श्रीराम नवमी व जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

HTML img Tag Simply Easy Learning    

पुरातन कालीन श्री राम मंदिरात भजन कीर्तन पाळणा आरती महाप्रसाद इत्यादी धार्मिक उपक्रमात श्रीराम भक्तांचा मोठा सहभाग.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा आरती संपन्न.

HTML img Tag Simply Easy Learning    

(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.६/४/२०२५) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रीरामनवमी उत्सव देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेल्या स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व श्रध्येय भक्तीभावाने साजरा करण्यात आला. श्री वटवृक्ष मंदिराच्या ज्योतीबा मंडपात दिनांक ४ एप्रिल ते दिनांक ६ एप्रिल अखेर
ह.भ.प.श्री योगीराज महाराज प्रकाश गोंदीकर [श्रीक्षेत्र अंबड, जि. जालना] यांची श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा संपन्न झाली. मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा, पाळणा कार्यक्रम सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
तसेच देवस्थानच्या स्टेशन रोडवरील पुरातन कालीन श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस सकाळी ६ वाजता देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरोहितांच्या वैदीक मंत्रोच्चारात प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक संपन्न झाला. तदनंतर सकाळी ८ ते १० या वेळेत विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ [चिकुर्डा, लातूर] श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ [वडगांव उस्मानाबाद] सार्वजनिक भजनी मंडळ [उदतपूर उस्मानाबाद] यांची भजनसेवा श्रींचरणी अर्पण झाली. सकाळी १० ते १२ या वेळेत लातूरचे कीर्तनकार ह.भ.प.विजय महाराज पांचाळ यांची श्रीराम जन्मावर कीर्तनसेवा सादर झाली. या कीर्तन सेवेत विजय महाराज पांचाळ यांनी आपले विचार व्यक्त करताना समाज एकसंध राहण्याकरिता संतांच्या विचाराची उजळणी करणे नितांत गरजेचे आहे. भगवंताचा अवतार समाजाचे दुःख स्वतःकडे घेऊन त्यांना सदासर्व काळ सुखाचं अमृतपान करणे हे आहे यासाठीच भारतभूमीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताचे वेगवेगळे अवतार प्रकट झाले. श्री स्वामी समर्थ हि एक दिव्य शक्तीपीठ असून त्यांच्या नामस्मरणामध्ये जो स्वतःला झोकून देतो त्यालाच त्यांच्या अवताराची प्रचिती येते. भगवान प्रभू रामचंद्र यांनी आचरणातून लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वांनाच स्वताच्या उध्दाराचा दिव्य मार्ग सांगितला या मार्गाने प्रत्येकाने वाटचाल करावे असे आवाहन केले. कीर्तनसेवेनंतर दुपारी १२ वाजता देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या सत्संग महिला भजनी मंडळाचे भजन होवून सनई चौघड्याच्या मंजूळ स्वरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला. यानंतर प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते गुलालपुष्प वाहून आरती संपन्न झाली. तदनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना भोजन महाप्रसाद देण्यात आले, हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर दर्शनाकरिता भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, ह.भ.प.काशिनाथ महाराज गुरव, संतोष पराणे, दीपक जरीपटके, प्रा.शिवशरण अचलेर, लक्ष्मण पाटील, विलास कटारे, दीपक पोतदार, संजय जाधव, चेतन जाधव, राघवेंद्र बागेवाडीकर, तानाजी बावणे, दत्तात्रय बेंबरे, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, संजय पवार, सागर गोंडाळ,
खाजप्पा झंपले, संतोष जमगे, तुषार मोरे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, प्रकाश कोळी, सचिन किरनळ्ळी, काशिनाथ सोलनकर, शिवशरण इचगे, अरूण शिंदे, सिद्धाराम लाळशेरी, संजय बडवे, श्रीशैल गवंडी, सिद्धाराम पाटील, नरसिंग क्षीरसागर, ऋषिकेश लोणारी, झिपरे मॅडम, कल्पना पाटील, ज्योती झिपरे, विमल साठे, श्यामला देशमुख, शिलवंती बणजगोळे आदींसह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – श्रीराम जन्मोत्सव प्रसंगी आरती करताना प्रथमेश इंगळे, महेश गोगी व भाविक दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button