अक्कलकोट सामाजिक वनिकरण विभागाच्या भ्रष्टाचाराची फेर चौकशी करावी; जिल्हाधिकारी यांना निवेदन,
निवेदन

अक्कलकोट सामाजिक वनिकरण विभागाच्या भ्रष्टाचाराची फेर चौकशी करावी; जिल्हाधिकारी यांना निवेदन,
लहुजी शक्ती सेनेकडून हलगी नाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/अक्कलकोट/दि.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट सामाजिक वनीकरण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समितीच्या कामाची चौकशी करण्यासाठी फेर चौकशी स्थापन करावी अन्यथा विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर येथील कार्यालयासमोर बेमुदत हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनातून दिला आहे.

सन २०१७ ते २०२३दरम्यान सामाजिक वनीकरण विभागास एनटीपीसी आणि शासकीय योजनेतून कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला. मात्र त्या निधीचा रोपवाटिका, वृक्ष लागवड, गट लागवड, रस्ता दुतर्फा आदि कामासाठी वापर न होता मोठा आर्थिक अपहार झाला. त्या संदर्भात शासनाकडून चौकशी समितीने मागील वर्षी २६,२७ सप्टेंबर आणि ५ डिसेंबर २०२३ रोजी अक्कलकोट तालुक्यातील वृक्षलागवड व इतर कामांची पाहणी व तपासणी करिता दोन दौरे केले होते. मात्र भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्याशी संगमत साधून दिखाव्याचा दौरा केला. विविध ठिकाणी स्थळ पाहणी करण्यात आलेली नाही. मजुरांच्या नावे बोगस अंगठे मारून लाखोंची बिले उचललेली. त्या अंगठ्यांची पडताळणी केलेली नाही. शासनाच्या विविध योजनेतून कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराबाबत विविध वृत्तपत्रांमधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावरून समाज माध्यमातून तसेच पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त झाला. त्या अनुषंगाने स्थापन झालेल्या चौकशी समितीने भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाऊन सत्यता पडताळून घेतली नाही. त्यामुळे सदर चौकशी समितीची फेर चौकशी होऊन मला अहवाल मिळावा. अन्यथा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सोलापूर येथील कार्यालयासमोर लवकरच बेमुदत हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिला आहे.
