गावगाथा

न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अक्कलकोट शाखेचे उप कार्यकारी अभियंता राजू आडम यांच्या हस्ते पूजन

गणेश दर्शन

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अक्कलकोट शाखेचे उप कार्यकारी अभियंता राजू आडम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

सालाबादाप्रमाणे यंदाही श्रींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. सदरील पुजा ही सोमवार दि. १६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आली असून, शमीवृक्षाखाली गेल्या ३४ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

याप्रसंगी उप कार्यकारी अभियंता राजू आडम यांचा न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सौरभ मोरे, आप्पा हंचाटे, प्रा.शिवशरण अचलेर, अतिश पवार, गोटू माने, प्रविण घाटगे, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, धानप्पा उमदी, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, रोहन शिर्के, संभाजीराव पवार, पिंटू साठे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, बसवराज क्यार, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, सागर पवार, अनिल गवळी, पप्पू कोल्हे, सोमनाथ शिंदे, किरण साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button