गावगाथा

बावडे यांनी वास्तववादी अन निपक्ष: पत्रकारिता करून वेगळा ठसा उमटविला : औसेकर महाराज

पत्रकार मारुती बावडे अक्कलकोट भूषण पुरस्काराने सन्मानित

बावडे यांनी वास्तववादी अन निपक्ष: पत्रकारिता करून वेगळा ठसा उमटविला : औसेकर महाराज

HTML img Tag Simply Easy Learning    

पत्रकार मारुती बावडे अक्कलकोट भूषण पुरस्काराने सन्मानित

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि.१७ : पत्रकार
मारुती बावडे यांनी निपक्ष:पाती,वास्तववादी आणि समाजाभिमुख पत्रकारिता करून स्वतःच्या कार्याचा एक वेगळा ठसा त्यांनी समाजामध्ये उमविलेला आहे ही बाब अक्कलकोटकरांसाठी निश्चितच भूषणावह आहे,असे गौरवोद्गार पंढरपूर देवस्थान
समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु
ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर
यांनी केले.रविवारी,अक्कलकोट येथील मंगरुळे फंक्शन हॉल येथे बावडे यांना अक्कलकोट भूषण पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.त्यावेळी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते.व्यासपीठावर श्री
सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष
पुष्पराज काडादी,जय हिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख, प्रेसिडेंट बब्रुवान माने देशमुख,वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सोलापूर आकाशवाणीचे केंद्रप्रमुख सुजित बनसोडे, श्रमिक पत्रकार संघाचे
अध्यक्ष विक्रम खेलबुडे, ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे,नगरसेवक महेश हिंडोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रईस टिनवाला,रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर,
ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी,संयोजन
समितीचे अध्यक्ष दिलीप सिद्धे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.पुढे बोलताना औसेकर महाराज म्हणाले,आज काल सर्वच ठिकाणी निपक्ष: पत्रकारिता करणे खूप
अवघड झालेले आहे अशाही परिस्थितीमध्ये
मारुती बावडे यांनी केवळ पत्रकारिता
नाही तर त्यांचे दत्त मंदिर असेल किंवा
इतर सामाजिक कार्यातूनही ते लोकांना
सुपरिचित आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

तळागाळातील
लोकांचे प्रश्न त्यांची संचारच्या माध्यमातून तडीस नेले. संचारचे संस्थापक स्वर्गीय आप्पासाहेब काडादी व रंगाअण्णा वैद्य
यांचा वारसा खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न काडादी परिवार करत आहेत त्यात त्यांच्या संस्कारशील वातावरणामध्ये
त्यांच्याच संस्थेमध्ये बावडे हे वाढले,ही
बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.केवळ त्यांच्या कार्यामुळे त्यांचा एवढा मोठा सन्मान होत आहे.अध्यक्षस्थानावरून बोलताना


म्हेत्रे म्हणाले, मारुती बावडे यांनी आत्तापर्यंत पत्रकारिता करत असताना कधीही कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल दुजाभाव केला नाही.
नेहमी सर्वांबद्दल त्यांनी सत्य आणि वास्तव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने काम करणारे ते तालुक्यात एकमेव पत्रकार आहेत.खरोखरच त्यांची पत्रकारिता इतरांसाठी प्रेरक आहे.कुरनूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरून पुरस्कार घेणे ही साधी गोष्ट
नाही आणि त्यात समस्त अक्कलकोटकरांनी अक्कलकोट भूषण म्हणून गौरव करणे ही
बाब निश्चितच सर्वांना अभिमानाने मान उंचावणारी आहे. त्यांच्या पत्रकारितेतून
अनेक तालुक्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत.महेश इंगळे म्हणाले,बावडे यांचे व्यक्तिमत्व खूप वेगळे आहे त्यांचे कार्य
त्यांचा परिचय करून देते.ते नेहमी सकारात्मक, उर्जावान, सजग
आणि जागरूक राहून पत्रकारितेचे कार्य
करत असतात म्हणून सर्व स्तरातून त्यांची पत्रकारिता फुललेली आहे. माने देशमुख म्हणाले,बावडे हे स्पष्ट आणि सडेतोड
भूमिका मांडणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचे कार्य आम्ही नेहमी जवळून पाहतो त्यांच्या आवाजात देखील जादू आहे. केंद्रप्रमुख बनसोडे म्हणाले, बावडे यांनी प्रिंट, डिजिटल, व्हिडिओ आणि ऑडिओ या चारही माध्यमातून उत्कृष्ट काम केले. त्यांचे सादरीकरण हे सर्वांना प्रिय आहे.त्यांच्याकडे असलेल्या काही खास गुणवैशिष्ट्यामुळे इतका लोकसंग्रह वाढला आहे.प्रत्येकाबरोबर केवळ ते संपर्क ठेवत
नाही तर नाती जपतात म्हणून ते लोकाभिमुख पत्रकार ठरले आहेत.यावेळी ज्येष्ठ नेते बळोरगी,तानवडे,संचारचे चन्नवीर भद्रेश्वर मठ,
शंभुलिंग आकतनाळ, तुकाराम दुपारगुडे आदींनी बावडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा
आढावा घेत प्रशंसा केली.प्रारंभी
श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन
व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी बावडे यांच्या
जीवन कार्याविषयीची ध्वनी चित्रफीतही
दाखविण्यात आली.मानपत्रचे वाचन
व निवेदन अभिराम सराफ यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविक
दिलीप सिद्धे यांनी केले आणि
बावडे यांचा सत्कार एवढा मोठा
करण्यामागचा उद्देश सांगितला.
कार्यक्रमात बावडे यांचा मानपत्र
देऊन संपूर्ण तालुक्याच्यावतीने सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.तत्पूर्वी
पंढरपूर देवस्थान समिती आणि अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान समिती यांच्यावतीनेही
त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संयोजन समितीच्यावतीने एड.शरद
फुटाणे,मल्लिनाथ साखरे,एजाज मूतवल्ली,जितेंद्रकुमार जाजू,काका पाटील,लाला राठोड,जावेद पटेल,उत्तम गायकवाड,मोहन चव्हाण रोहिदास राठोड आदींनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.आभार सुधीर माळशेट्टी यांनी मानले.यावेळी बावडे यांच्या सत्कारासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब, शेतकरी संघर्ष समिती, शिक्षक संघटना तसेच विविध सेवाभावी संस्था, संघटना,विविध राजकिय पक्षांचे पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केल्याचे
चित्र दिसून आले.

 

मारुती बावडे यांना
अश्रू अनावर …!

कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांची उपस्थिती आणि उपस्थितांचे प्रेम आणि सत्कार पाहून भाषणादरम्यान बावडे यांना अश्रू अनावर
झाले.यावेळी त्यांनी अक्कलकोट शहर व तालुक्यातून व जिल्ह्यातून आलेल्या सर्वांचे अंतकरणपूर्वक आभार मानले आणि या पुढच्या काळातही पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार
व्यक्त केला.अक्कलकोटकरांनी दिलेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून
पुरस्कार समर्पित करत असल्याची
भावना व्यक्त केली.

 

संचारसाठी
गौरवास्पद बाब

अक्कलकोट शहर व तालुक्यात मारुती बावडे यांचे करत कार्य निश्चितच चांगले आहे. त्यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार
ही बाब संचारसाठी देखील गौरवास्पद आहे.
संचारने नेहमीच सामाजिक बांधिलकीचा
वसा जोपासला आहे तो वसा त्यांनी देखील आपल्या कार्यातून तालुक्यातून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा गौरव पाहून आनंद आणि समाधान वाटले.

पुष्पराज काडादी, अध्यक्ष श्री सिद्धेश्वर साखर कारखाना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button