
आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…
गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी…जोगेश्वरी पूर्व येथील प्रताप नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे जमा करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य व खाऊ नुकतेच गोरेगाव आरे कॉलनी येथील मोराचा पाडा येथील आदिवासी विद्यार्थ्याना वितरीत करण्यात आले.गणपती उत्सव काळात विभागातील नागरिकांच्या वतीने श्री गणरायाच्या चरणी शैक्षणिक साहित्य अर्पण करण्यात येते आणि त्यानंतर जमा झालेले हे साहित्य गरजू वंचित मुलांना देण्यात येते.अनेक वर्ष हा सामाजिक उपक्रम मंडळ राबवित आहे.मंडळाचे कार्यकर्ते दिनांक ६ ऑक्टोबर रोजी गेले होते.
