मानववंशाच्या कल्याणासाठीच स्वामी भूतलावर अवतरले – पुष्पा मेघे.स्वामी भक्तीच्या माध्यमातून स्वामी दर्शनाने वटवृक्ष मंदिरात व्यक्त केल्या भावना.
पुष्पा मेघेंचा महेश इंगळेंनी स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला सन्मान.

मानववंशाच्या कल्याणासाठीच स्वामी भूतलावर अवतरले – पुष्पा मेघे.स्वामी भक्तीच्या माध्यमातून स्वामी दर्शनाने वटवृक्ष मंदिरात व्यक्त केल्या भावना.

पुष्पा मेघेंचा महेश इंगळेंनी स्वामींचे
कृपावस्त्र देऊन केला सन्मान.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३/१०/२३) –
अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्षे उलटून गेली, परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. या “सगुण ब्रह्मा’ची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन् भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामींच्या भक्ती प्रचितीतून त्यांच्या अस्तित्वाचे अन् कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रातील अक्कलकोट मध्ये सामावला ही केवढी भाग्याची गोष्ट ? परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानववंशाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करीत असतो,
त्यामुळे मानववंशाच्या कल्याणासाठीच स्वामी भूतलावर अवतरले असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे खासदार दत्ता मेघे यांच्या पत्नी पुष्पा मेघे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी पुष्पा मेघे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी पुष्पा मेघे बोलत होते. यावेळी अक्कलकोटचे युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे, राष्ट्रवादीचे नेते दिलीप भाऊ सिद्धे, शिवराज स्वामी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – पुष्पा मेघे यांचा वटवृक्ष मंदिर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, दिलीप भाऊ सिद्धे, शिवराज स्वामी व अन्य दिसत आहेत.
