श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य आदर्शवत – पो.महासंचालक कृष्णप्रकाश
मंदिर समितीच्या उल्लेखनीय कार्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे.

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य आदर्शवत – पो.महासंचालक कृष्णप्रकाश

मंदिर समितीच्या उल्लेखनीय कार्यामुळे भाविकांची गर्दी वाढत आहे.

स्वामी दर्शनानंतर व्यक्त केले मनोगत

Shrishail Gavandi –
राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या धरतीवर स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट नगरीतील मूळस्थान वटवृक्ष मंदिर समितीचे उपक्रम भाविकांच्या सोयीचे आहेत. गर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समितीचे नेहमीच सचोटीचे प्रयत्न असतात. त्यात नेहमी उत्कृष्ट सेवा देऊन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समिती भाविकांना नेहमीच सर्वोत्तम सोई सुविधा पुरवीत आहे. सर्वोत्तम सोयी सुविधांबरोबरच कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांच्या स्वामी दर्शनाचे नियोजन करण्याचे कार्य महेश इंगळे व मंदिर समिती विश्वस्तांनी हाती घेऊन ती यशस्वीपणे राबवित आहे याचे खूप मोठे समाधान वाटते. त्यामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य आदर्शवत असल्याचे मनोगत मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांनी अप्पर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी महासंचालक कृष्णप्रकाश बोलत होते. पुढे बोलताना कृष्णप्रकाश यांनी मंदिर समितीचे हे उपक्रम सर्वच स्तरातील स्वामी भक्तांकरिता उपयोगी असून यापुढेही समितीने अशाच पद्धतीने उपक्रम राबवून स्वामी दर्शनाची नेटाने व्यवस्था करीत राहावी याकरिता मंदिर समितीच्या प्रती शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डी.वाय.एस. पी. यामावार साहेब, नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, निरीक्षक पुजारी साहेब, धनराज शिंदे, गजानन शिंदे, शरद चव्हाण, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, चंद्रकांत सोनटक्के आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा सत्कार करताना देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे दिसत आहेत.
