ग्रामदैवता

उद्या पासून वागदरी येथे श्री परमेश्वर पर्व महोत्सवाल सुरुवात: शुक्रवारी पालखी पूजा उस्मानाबादचे एस पी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार…

गुरुवार व शुक्रवारी अखंड अन्नदान सह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

उद्या पासून वागदरी येथे श्री परमेश्वर पर्व महोत्सवाल सुरुवात: शुक्रवारी पालखी पूजा उस्मानाबादचे एस पी अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते होणार…

गुरुवार व शुक्रवारी अखंड अन्नदान सह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

वागदरी — पालखी पूजा साठी उस्मानाबादचे एस पी येणार
वागदरी परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव च्या पालखी महापूजा साठी उस्मानाबाद येथील एस पी पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी साहेब येणार आहे. त्यांना आमंत्रण देण्यासाठी आज मंगळवारी आराधना पर्व पंच कमिटीचे सदस्य माननीय घाळय्य मठपती, परमेश्वर पोमाजी, तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष माननीय शरणप्पा मंगाणे,अशोक पोमाजी व शिवानंद गोगाव यांनी जाऊन साहेबाना आमंत्रण दिले. साहेबांनी आमंत्रण स्वीकारले.

वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव दि,२१ सप्टेंबर पासुन प्रारंभ होणार असुन, त्या निमित्त विविध धार्मिक व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील दि,२०रोजी सायंकाळी ७.३० वाजता कंटली पूजनाने पर्व उत्सवाला प्रारंभ होणार आहे, परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा सण म्हणुन प्रसिध्द आहे, खरीप हंगातील सर्व कामे उरकुन, रब्बी पेरणीची तयारी करून पर्व उत्सव साजरा करतात, वागदरी परमेश्वर पालखी झाल्यावरच या भागातील शेतकरी रब्बी पेरण्या सुरू करतात, दि२१. सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता श्री च्या मूर्ति स महाभिषेक केला जाता,सकाळी ११ वाजता म नि प्र शिवलिंग महास्वामी विरक्त मठ वागदरी, गुरुकुल भूषण श्री ष ब्र विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य हिरेमठ संस्थान अफझलपूर यांच्या दिव्य सानिध्यात अंबील घागरीची मिरवणुक गावातील प्रमुख मार्गावरून हनुमान मंदिर पासुन परमेश्वर मंदिर पर्यंत निघते, त्यानंतर उपस्थित मान्यवराच्या प्रवचन व धर्म सभा संपन् होणार आहे, या दिवशी कर्नाटक, महाराष्ट्र व मराठवाडा येथील विविध कलापथकांचे आगमान होणार रात्रभर कार्यक्रम संपन्न होणार आहे,


दि, २२ रोजी दुपारी १२ वाजता परमेश्वर मंदिरापासून श्री ची भव्य पालखी मिरवणुक गावातील व परगावहून आलेल्या सर्व कलापथकासह मिरवणुक निघणार, रात्री नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर भाकणुक होऊन कार्यक्रमाची सांता होणार आहे, या पर्व महोत्सव ची प्रमुख वैशिष्टे म्हणजे अन्नदान व राष्ट्रीय एकात्मता होय, सर्व जाती धर्मातील लोक जातीभेद विसरून या कार्यक्रमात सहभागी हातात,तरी या पुण्य व पवित्र कार्यात सहभागी होऊन महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button