गावगाथा

वागदरी गाव शोकसागरात बुडाला…….

इतिहासात पहिल्यांदाच दुर्दैवी घटना घडना

गावावर शोकसागरात बुडाला…….

HTML img Tag Simply Easy Learning    

गाव शोकसागरात बुडाला,गावावर शोककळा पसरली..असे अनेकदा ऐकले आणि वाचले…
माझ्या दुर्देवाने माझ्या गावावर ही वेळ 26/03/23 रोजी आली,
पण देव करो अशी वेळ कुठल्याच गावावर ,कुटुंबावर येवू नये..
आपला परमेश्वर तर मायाळू, दयाळू, भोळा शंकर,नवसाला पावणारा ,जागृत असा पंचक्रोशीत आणि पै पहुण्यात प्रसिद्ध ,परमेश्वराच्या या लीलेमुळे वागदरितील असे एखादे घर नसावे की जन्मलेल्या मुलाचे पाहिले नाव परमेश्वर ठेवले नसावे,त्यामुळे प्रत्येक घरात परमेश्वर….लहानपणी गावात दुष्काळ पडत असताना ,गावातील लोक ओल्या कपड्याने मंदिरात भजन करीत..गावकऱ्यांची भक्ती पाहून कोरडा दुष्काळ जणू लुप्तच झाला,दहावी बोर्ड परीक्षा आली तरी आपले शिक्षक -शाळा मुलांच्या कल्याणासाठी ,फॉर्म भरण्या आधी परमेश्वरास अभिषेक करतात,परीक्षा असो कुठली निवडणूक ,सुख असो दुःख गावकरी प्रत्येक क्षणाला आपल्या परमेश्वराला सोबत घेणार, कुणी आजारी पडले तर जेव्हा डॉक्टर पण आपले प्रयत्न थांबवतात
तेव्हा गावकरी शेवटचा एकच पर्याय म्हणजे डोळे मिटून हाथ जोडून आपल्या परमेश्वराचे नामस्मरण,भक्तांचे प्राण वाचविणारा परमेश्वर,शेती निसर्ग साथ देईल याची शास्वती नाही त्यामुळे प्रत्येक घरात आपल्या परमेश्वराच्या कृपेने एक नोकरदार डॉक्टर, इंजिनिअर,पोलीस,ग्रामसेवक,महाराष्ट्र राज्य एसटी ड्रायव्हर,कंडक्टर,शिक्षक- शिक्षिका,आरोग्य सेवक,इतर खाजगी व सरकारी नोकरी यांच्या स्वरूपात किंवा छोट्या मोठ्या उद्योग समूहात सामावून गाव कसे आनंदी आणि सुखी राहील याची काळजी घेतली आहे,सर्वांना परमेश्वराची सेवा भक्ती करता यावी ,आपल्या गावाचे वैशिष्टय म्हणजे एक गाव ,एक मंदिर दोन यात्रा..पर्व आणि रथोत्सव गावातील सर्व समाज एकत्र येवून एकजुटीने साजरा करण्यात येते,दोन्ही यात्रेत यात्रेत जितके भाविक सहभागी होतील सर्वांना महाप्रसाद व्यवस्था..कितीही दुष्काळ पडला,अडचणी आल्या तरी देवस्थान कमिटी , ग्रामस्थ यात्रा करण्यात कुठेही कमी नाही पडत ना महाप्रसाद मध्ये खंड पडत……सर्वांच्या अंतकरणात परमेश्वर ,काही झालं तरी परमेश्वर पाहून घेईल. अडचणीतून ,संकटातून परमेश्वर मार्ग काढेल,गाव कार्यांसाठी परमेश्वर फक्त मूर्तीतील देव नाही तर प्रत्येक क्षणाला,प्रत्येक श्वासा ला,एक सोबती असल्याचा अनुभव आहे,परमेश्वराच्या कृपेने गाव सुखी ,आनंदी आणि समृद्ध होता, पै पाहुणे आणि
गावातील व्यक्ती नोकरीसाठी जरी बाहेर गावी असला तरी ह्या दोन यात्रेला गावात नक्की येणार याची गावातील प्रतेकाला खात्रीच असणार,
शंभर वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेल्या या
रथोत्सव
यात्रेची सुरुवात गुढी पाडव्याला आनंदाने आणि उत्साहाने पहाटे घरातून मंदिरापर्यंत दंडवत घालून झाली ,पाहिले चार दिवस अभिषेक,पूजा ,गावातून परमेश्वर ची पालखी,बैल सजवून नगारे,महादेवाची कावड, ऊचाई म्हणजेच सजवून छोटा रथ ची ढोल, ताशाच्या आणि नगराच्या गजरात दिमाखात गावातून प्रत्येकाला दर्शन देत मंदिरात परत येई..
पाचवा दिवस उजाडला सालाबादप्रमाणे दुपारी कलशारोहण ,नैव्यद्य सजवलेल्या दोन्ही रथाला दाखवून झाले आणि रथाला छोटा रथ मंदिराजवळ आले आणि ज्याची सर्वांना उत्सुकता होती त्या रथोत्सव यात्रा सुरू झाली .सायंकाळी ,०६:१५ वाजता..गावातील प्रत्येक व्यक्ती आणि पंचक्रोशीतील भाविक परमेश्वर मंदिरासमोर , बाजार पेठ मध्ये भाविकांची गर्दी करून आपल्या महादेवाच्या रथ जागा सोडण्याची वाट पाहू लागले,पुरांत नाचू लागले आणि अनेक वर्षांच्या परंपरे प्रमाणे ,परमेश्वर महाराज की जय या हजारोंच्या जयघोषात रथ पुढे सरकू लागले ,शेकडो हाथ रथ पुढे घेऊन जाण्यास लागले..रथाच्या मार्गाची पद्धत वरून नवीन आणि जुने वर्ष कसे जाणार आणि कसे गेले याचा अंदाज लावत असतं…. परमेश्वर महाराज की जय या जयघोषात आपल्या महादेवाचं सजलेला चार 12 फूट दगडी चाकांचा 50- 55 फूट रथ मोठ्या दिमाखात , डौलात संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण करत बसवेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले आणि मंदिराजवळ जावून स्थिर झाले , निम्मी रथोत्सव यात्रा आनंदात संपन्न झाली,
गेलेले वर्ष तर आनंदाचे , सुखाचे गेले जणू संकेतच,आता उत्कंठा होतो येणारे 2023 वर्ष कसे असेल…..बसवेश्वर मंदिरातील पूजा झाल्यानंतर मूळ जागी म्हणजेच परमेश्वराच्या मंदिराजवळ जाण्यासाठी रथ प्रस्थान होण्यास तयार झाले आणि थोडे अंतर कापून झाल्यावर रथ थांबले ,5-10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपल्या रथाने मार्ग धरला,लाखो भाविक परमेश्वर महाराज की जय ,आपल्या परमेश्वर महाराजांचा जयघोष,जयजयकार करत ,हजारो भाविक परमेश्वराचे भक्तीसागरात बुडाले असताना ,शेकडो हाथ रथ पुढे ओढताना,ह्या इतक्या 50-55 फूट उंच आणि वजनदार 12 फुटी दगडी चाकाना दिशा देत असताना ,रथाची आतील बांधणी ची नेहमी प्रमाणे मजबूत राहावी फक्त यावरच लक्ष देणाऱ्या हाथ ना,सायंकाळीच वेळ असल्याने लखं प्रकाश मध्ये आपल्या परमेश्वर महाराजांचे रथाचे दर्शन व्हावे म्हणून मोठ मोठे दिवे दिवटी घेऊन भाविक ,पुढे जाणाऱ्या रथावर खारीक बाथाशा ची उधळण करीत असताना,आपल्या गावासाठी नेहमी तत्पर असलेले पोलीस यंत्रणा काही अघटीत होऊन नये ,यात्रे मध्ये कुठले विघ्न येऊ नये याची काळजी घेत बंदोबस्तात , कर्तव्यात मग्न असताना………….सर्वांच्या काळजाच्या एकाच वेळी ठेका चुकला…..काय झाले,का झाले, काय चुकले,कुणालाच कुठला अंदाज लावता येईना,शेकडो वर्षांची परंपरा असताना,सारे काही व्यवस्थीत ,आनंदात असताना ,ज्या यात्रेची, रथोत्सव ,क्षणाची वाट पाहत होतो त्या क्षणाला साऱ्यांचे नेत्र पाणावले,,,जागृत परमेश्वर म्हणून ज्याची ख्याती आहे , आपल्या सर्वांचा तारणहार ,दयाळू ,भक्ताच्या हाकेला ,नवसाला पावणारा आज का इतका कठोर झाला की परमेश्वरावर च संकटाचे आभाळ कोसळले हेच कळेना…इतकी भक्ती करणाऱ्या भक्तांकडून काय बरे चुकले असावे,हेच कुणास कळेना आपल्या देवावर आलेले संकट पहण्याखेरिज दुसरा कुठलाच पर्याय हजारो भक्तांकडे नव्हता,माईक मधून एकच आवाज गर्दी करू नका,सर्वांनी घरी जावे ,गर्दी कमी करा काय आणि कसे झाले याचे उत्तर मन शोधत असताना आपल्या परमेश्वराची रथाची अचानक झालेली स्थिती पाहताना पायातील त्राण गेलेले असताना कुणाला दुखापत झाली नसावी असे शब्द कानावर पडावेत असे मनोमनी वाटत असताना ,जे होऊ नये आणि ऐकू नये तेच शब्द कानावर आले, संजय नंदे आणि गंगाराम मंजुळकर या भाविकांचा परमेश्वराची सेवा करीत असताना देवज्ञा झाली………..शेकडो वर्षाच्या परंपरेला 26/03/2023 रोजी तडा गेला….पिढ्यानपिढ्या यात्रा व्यवस्थीत पार पाडीत असताना ह्या वर्षी परमेश्वर आपल्या भक्तावर का नाराज झाला असेल हे परमेश्वरा स च ठाऊक….पण नंदे आणि मंजुकलकर यांना ह्या संपूर्ण गावाच्या ग्रामदैवत परमेश्वर महाराजांची सेवा करताना देवज्ञा झाली आता ह्यांच्या कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्य ही संपूर्ण गावाची आहे,त्यासाठी समिती तयार झाली आहे ,प्रत्येक जण प्रयत्न करतोय त्यासाठी ,ज्यांना शक्य आहे तसे प्रत्येकाने प्रयत्न करावे,लोक वर्गणी,कुणी शासनाचे पाठपुरावा करून ,प्रत्येकानी आपली जबाबदारी ,कर्तव्य म्हणून ह्या दोन कुटुंबाला
जमेल त्या पद्धतीने मदत करून बळ देणे गरजेचे आहे आणि द्यावे ही नम्र विनंती,घडलेली घटना आपण टाळू जरी शकलो नसलो तरी आपण ती सावरण्यासाठी प्रयत्न तर करूयात…ह्या कुटुंबाला बळ देणे हीच परमेश्वर सेवा… गावसाठी ही खूप खेद जनक घटना याची कधीही भरपाई होणार नाही पण आपल्या कडून काही न कळतपणे चूक झाल्यास ,आपण माफी मागितल्यास आपला परमेश्वर नक्कीच आपल्याला माफ करेल कारण आपला परमेश्वर खूप दयाळू आणि तारणहार आहे,पुढे सर्व व्यवस्थीत व्हावे हीच माझ्या परमेश्वर चरणी प्रार्थना…..🙏🏻🙏🏻

HTML img Tag Simply Easy Learning    

शब्दांकन — ओम पाटील, वागदरी

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button