हुरडा महोत्सव

कन्हैयालाल झुलामध्ये हुरडा महोत्सवास प्रारंभ

महेश इंगळेंच्या हस्ते हुरडा महोत्सवाचे शुभारंभ

कन्हैयालाल झुलामध्ये हुरडा महोत्सवास प्रारंभ

HTML img Tag Simply Easy Learning    
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

महेश इंगळेंच्या हस्ते हुरडा महोत्सवाचे शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूरच्या पाकणी येथील पुणे हायवे लगत असलेल्या कन्हैयालाल झुला भोजन व पिकनिक पॉईंट मध्ये यंदाच्या हुरडा महोत्सवास नुकतेच प्रारंभ झाले. या हुरडा महोत्सवाचे शुभारंभ नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कन्हैयालाल झुला भोजन व पिकनिक पॉईंटचे मालक कपिल बजाज, मधुर बजाज, डॉ.स्वप्नाली बजाज, प्रितेश जाजू, रोहिणी देवकुळे, वासंती तांबेकर व सेवा सदन प्रशालेचे माजी मुख्याध्यापिका मानसी दामले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी भारतासारख्या कृषी प्रधान देशात आज पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण होताना दिसत आहे. त्या माध्यमातून बाहेर हॉटेलिंगची आजच्या तरुण पिढीमध्ये मानसिकता रुजलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर सारख्या स्मार्ट सिटीत कृषीप्रधान भारतीय संस्कृतीची परंपरा टिकविण्याकरिता अशा प्रकारचे हुरडा महोत्सव नेहमीच आदर्शवत ठरतील अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. यावेळी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह मंदिर समितीचे श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, शिवशरण अचलेर आदींसह स्विमिंग ग्रुपचे सदस्य संतोष पराणे, अरविंद पाटील, श्रीकांत झिपरे, सुनील पवार, बाबा सुरवसे, शेखर आडवीतोटे, शिवशंकर बिंदगे, प्रकाश शिंदे, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, स्वामीनाथ मुसळे आदींनी यावेळी मनसोक्त हुरड्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशरण अचलेर यांनी केले तर आभार कपिल बजाज यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कन्हैयालाल झुला हुरडा महोत्सवाचा शुभारंभ व हुरड्याचा आस्वाद घेताना महेश इंगळे व स्विमिंग ग्रुपचे सहकारी दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button