अक्कलकोट : अक्कलकोट येथील क्रीडा शिक्षक कल्याणी लकशेट्टी यांना चिपळूण येथे राज्यस्तरीय कोकण गौरव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ संजय भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कोकण विद्यापीठ उप कुलगुरू प्रदीप हळदणकर, महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष शशिकांत शेळके, चिपळूणचे उद्योजक डॉ. विजय माटे, डॉ विलास मोरे, सुशील शिंदे, पत्रकार सतीश लोस्टे चिपळूण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अक्कलकोट येथील श्री शारदा माता इंग्लिश मीडियम स्कूल येथील क्रीडा व संस्कृत शिक्षक कल्याणी लकशेट्टी हे गेली 32 वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांना या अगोदर देखील विविध संस्था संघटनेकडून विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!