
भुरीकवठे येथील ब्रह्माकुमारी केंद्रावर महाशिवरात्र निमित्त झेंडावंदन संपन्न
भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्रावर सोमवार दिनांक 3 मार्च 2025 रोजी ठीक सकाळी दहा वाजता श्री भीम खंडेराव इंगळे माजी सैनिक श्री जगन्नाथ कुंभार लहानस हवालदार भालकी यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम अडीचशे साधकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सर्वप्रथम अक्कलकोट शाखेच्या संचालिका बीके सुमन बहन जी यांनी ध्वजाचे पूजन केले.
कुमारी वैष्णवी माशाळ स्नेहल धुळगुंड शक्ती माशाळ यांनी स्वागत गीत सादर केले कुमारी गौरी व प्रिया यांनी सत्यम शिवम सुंदरम यावर नृत्य सादर केले कुमारी संस्कृतीने लागी लगन वरती नृत्य सादर केले कुमारी अक्षता कुमारी संस्कृती व कुमारी भाग्यश्री यांनी सद्गुरु प्यारेला गीत व नृत्य सादर केले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना संस्थेच्या वतीने फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले संस्थेचे प्रमुख श्री शिव शंकर भाई यांनी संस्था परिचय करून दिले त्याचबरोबर संसारातील दुःख अडीअडचणी वर मात करण्याकरिता मायेच्या बंधनातून मुक्त व्हावे व साधक म्हणून ईश्वराचे सतत ध्यान करावे असे उद्बोधक विचार सुद्धा त्यांनी उपस्थिता समोर व्यक्त केले.
यावेळी आळंद कर्नाटक येथील महादेवी साधक यांनी कन्नड मधून गीत सादर केले. शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थाप्रमुख श्रीमंत भाई रायगोंडे साधक दिलीप पोतदार आप्पासाहेब कलशेट्टी गोगावचे जगताप वाघदरीचे श्री शिरगण व कांची भाई व इतर अनेक साधकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्री चंद्रकांत पोतदार यांनी केले.
