स्टेट बँक इंडिया शाखा वागदरी मॅनेजर अरविंद कुमार बदली निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार..
निरोप समारंभ

स्टेट बँक इंडिया शाखा वागदरी मॅनेजर अरविंद कुमार बदली निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार..

वागदरी — येथील स्टेट बँक इंडिया शाखा वागदरी मॅनेजर अरविंद कुमार बदली निमित्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले . यावेळी डॉ. शरण वरनाळे ,मलकप्पा पोमाजी,महादेव सोनकावडे व संपूर्ण बँक कर्मचारी स्टॉप यांच्या वतीने निरोप देऊन सत्कार करण्यात आला.बँक मॅनेजर अरविंदकुमार साहेब यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी पदभार स्वीकारला होता.तेव्हा पासून त्यांची काम करण्याची पध्दत अतिशय प्रभावी व बँकेत आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे प्रेमानं व आदराचे वागत असे. बँक खातेदारांना ते कधीही रागावत नव्हते व त्यांची कामे वेळेवर करायचे. त्यांच्यामुळे बँकेला एकप्रकारची शिस्तता मिळाली होती.
बँकेतील आपल्या सर्व कर्मचारी याना सोबत घेऊन ते काम करायचे.अशा कर्तव्यदक्ष बँक मॅनेजरची बदली झाली आहे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी तात्पुरते मॅनेजर महेश कुडापे साहेब,वेदांत देशपांडे, बँक कॅशियार प्रवीण बेरे, डॉ शरण वरनाळे,मलकप्पा पोमाजी,सुरक्षा रक्षक मिठारी मेजर, अंकुश सावंत,धानलिंग सलगरे,नजीर मुल्ला उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत महादेव सोनकावडे यांनी मांडले.
