ग्रामीण घडामोडी

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे सुधारित नव्या दराने तयार करावे – राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा

अक्कलकोट दि,30 : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे ही 2017-18या सालातील दरानुसार आहेत. ती सुधारित नव्या दराने तयार करावे. यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे मार्गदर्शन घ्यावेत. जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल असे राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबतची बैठक बुधवारी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील दालनात संपन्न झाली. याप्रसंगी त्यांनी बैठकीत आदेश दिले.
या बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी, विधी व न्याय विभागाचे सचिव एन.टी.धोटे, परिवहन विभागाचे सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीव जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य सचिव संजय खंदारे, पर्यटनचे सचिव सौरभ विजय यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंत्रालयातील नगरविकास विभागाचे (नवी 18 चे) कक्ष अधिकारी विलासराव धाईंजे, जिल्हा पालिका अधिकारी आशिष लोकरे, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील हे उपस्थित होते.
या बैठकीत श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या विकासा करिता व्यापक चर्चा संपन्न झाली. मात्र आराखड्यातील विकास कामे ही 2017-18 या सालातील असल्याने कामे मंजूर होण्याकामी अडचण असणार असल्याने सदर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुधारित दराने तयार करुन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर मुंबई येथे जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात बैठक पुनश्च आयोजित करण्यातबाबतचा आदेश मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी दिले. या बैठकीत श्रीक्षेत्र अक्कलकोटबाबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरुन विषय मार्गी लावण्यात येत आहेत.
मंदिर परिसरातील रस्ते, सांड पाण्याचा निचारा, पिण्याच्या पाण्याची सोय, अतिक्रमण काढुन, पुर्नवसन, पालखी मार्ग विस्तारीकरण, भूसंपादन करुन मालमत्ता धारकांना द्यावयाची रक्कम, पर्यटन विकास, आजु-बाजुंची गावे, वीज, रस्ते, पाणी, मुलभूत गरजा बाबत आदी विकास कामे मार्गी लावगणार आहे.
सन 2017-18 विकास आराखडा हा 146 कोटी रुपयांचा होतो. आता सुधारित दरानुसार आराखडा तयार करण्यात येणार आहे. नगरपालिका पदाधिकारीविना प्रशासकांची पहिलीच बैठक मंत्रालयात संपन्न झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button