अप्पर पोलीस अधिक्षक यावलकरांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार प्रथमेश इंगळेंच्या हस्ते झाला सन्मान
प्रीतम यावलकरांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

अप्पर पोलीस अधिक्षक यावलकरांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार प्रथमेश इंगळेंच्या हस्ते झाला सन्मान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४/१२/२३) –
सोलापूरचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी पोलीस अधीक्षक यावलकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, व्यंकटेश पुजारी, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे उपस्थित होते.

फोटो ओळ – प्रीतम यावलकरांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
