अक्कलकोट वटवृक्ष स्वामींच्या पालखी मिरवणुकीने दत्त जयंतीची सांगता
दत्तजयंती पालखी मिरवणूकीचे शुभारंभ करताना अमोलराजे भोसले, महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

- वटवृक्ष स्वामींच्या पालखी मिरवणुकीने दत्त जयंतीची सांगता.
अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता गुरूवारी सायंकाळी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीने झाली. प्रारंभी आज पहाटे पाच वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती संपन्न झाली. पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रीदत्त जन्मोत्सवा निमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने वटवृक्ष मंदिरात १५१ किलोचा केक कापण्यात आला. दत्त जयंती निमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करिता स्वामी भक्तांच्या वतीने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी ११:३० वाजता श्रींची महानैवेद्य आरती संपन्न होऊन श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आले.
दुपारी १२ ते ३ या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्त निवास येथील भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सत्संग महिला भजनी मंडळाचा भजन सोहळा संपन्न झाला. सायंकाळी
५ वाजता सदगुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभीक आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व्यंकटेश पुजारी व पुरोहितांच्या हस्ते संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांचे हस्ते पालखी पूजन होवून महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आले. या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, प्रा.नागनाथ जेऊरे, गणेश दिवाणजी, मंगेश फुटाणे, रामचंद्र समाणे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय पवार, प्रसन्न हत्ते, किरण किरात, शशिकांत लिंबितोटे, अमर पाटील, निखिल पाटील, दिलीप हजारे, शिवशरण अचलेर, दिपक जरिपटके, संजय बडवे, चंद्रकांत सोनटक्के, प्रसाद किलजे, अण्णा सावंत, विजय इंगळे, प्रथमेश पवार, वैभव मोरे, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, महेश काटकर, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी, अक्षय सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, बंडेराव घाटगे, यांच्यासह मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, उमरगा,तुळजापूर इत्यादी भागातून दिंडयांसह टाळकरी, विणेकरी, आदींसह हजारो स्वामी भक्त व दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले होते. श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवार पेठेतील श्री स्वामी समाधी मठापर्यंत व तेथून परतीस रात्री साडे नऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, टाळकरी, विणेकरी, भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला.

फोटो ओळ – दत्तजयंती पालखी मिरवणूकीचे शुभारंभ करताना अमोलराजे भोसले, महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
