आठवणीतला शाळा

निसर्गाच्या सानिध्यात बैलगाडी मध्ये बसून जिल्हा परिषद मराठी शाळा जेऊर येथील विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा वनभोजन उत्साहाने संपन्न ..

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा जेऊर त्याचप्रमाणे  दाऊल मलिक वस्ती व काकासाहेब पाटील वस्ती शाळा या तिन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमानाने वनभोजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

निसर्गाच्या सानिध्यात बैलगाडी मध्ये बसून जिल्हा परिषद मराठी शाळा जेऊर येथील विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा वनभोजन उत्साहाने संपन्न ..

HTML img Tag Simply Easy Learning    

जेऊर — जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा जेऊर त्याचप्रमाणे  दाऊल मलिक वस्ती व काकासाहेब पाटील वस्ती शाळा या तिन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमानाने वनभोजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी तसेच मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांचे भावविश्व अनुभव संपन्न करण्यासाठी आमच्या *जि. प. मराठी शाळा जेऊर* तालुका अक्कलकोट तर्फे वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्यापैकीच एक स्तुत्य उपक्रम म्हणजे …
*वनभोजन*….
शेतात जाऊन भोजन करणे,एक दिवसभर दप्तरविरहित अनौपचारिक वातावरणात शाळा भरविणे.पुस्तकाविना अध्यापन करणे,दिवसभर गप्पा ,गाणी ,गोष्टी सांगणे.मनमोकळ्या चर्चा करणे,खेळ खेळणे , नंतर सर्वानी सामूहिकपणे वनभोजन करणे असे या दिवसाचे स्वरूप होते. जेऊर मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री *गंगाधर जमादार सर* व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष *श्री बसवराज बोरीकरजगी* यांनी यावर्षी विद्यार्थ्यांना बैलगाडी मध्ये शेतात नेऊन निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचे नियोजन केले. आजच्या या आधुनिक युगात शेतीचे बरेचसे कामे ट्रॅक्टरच्या मदतीने होते. बैलगाडी पहायला सुद्धा दुर्मिळ झालेले आहे असे असताना सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बसवराज बोरीकरजगी यांनी गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांना व गावकऱ्यांना आव्हान केले की यावर्षी आपण विद्यार्थ्यांना वनभोजनासाठी बैलगाडी मध्ये नेऊया .सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद म्हणून एक नव्हे दोन नव्हे तर 30 बैलगाड्याचे नियोजन केले.
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व तीन वेळा सरपंच पद भूषवलेले *श्री महांतेश पाटील* , करजगी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी *श्री हरीश गायकवाड साहेब* व *काशीरायाकाका पाटील* यांच्या शुभहस्ते *बैलगाडी पूजन* करण्यात आले व त्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर सर्व 30 बैलगाड्या एका मागून एक हलगीच्या वाद्यात *श्री सुरेश बोरीकरजगी* यांच्या शेताकडे मार्गस्थ झाले.
बैलांना सजवण्यासाठी रंग व पेंट यासाठी खरी *आर्थिक मदत* मिळाली ती गावातील नागरिकांची.त्यामध्ये ज्यांची शाळेसाठी नेहमी पुढाकार घेऊन ते कार्य पुर्ण करण्यासाठी नेहमी धडपड असते असे *श्री. पंडित गुरव सर, श्री शिवाजी कदम, श्री सैपन्न मुल्ला , श्री यलप्पा हडपद, श्री बशीर मुल्ला व श्री विशाल शिंदे* मोलाची भुमिका ठरली.

HTML img Tag Simply Easy Learning    

*श्री रमजान कोरबू, अर्जुन राठोड, याकूब हवालदार साहेब, श्रीकांत आलूरे ,कासू राठोड ,बसवराज कोळी ,मुबारक मुल्ला ,कांतु वग्गे, बसू राठोड ,गांधी राठोड ,चंदू कोळी, बसू कोळी ,शम्मू कोरबू, कासू चौलगी नुरु मुल्ला, विश्वनाथ चौलगी ,अमीन मुल्ला ,अल्ला मुल्ला ,शिवानंद हुक्केरी ,अल्ला कोरबू ,श्रीकांत पत्रिगिडा, धुळप्पा कोळी,कासू अमंती, जाफर अत्तार* या सर्वांनी विद्यार्थ्यांसाठी *बैलगाडी* उपलब्ध करून दिले.
या सर्वांच्या मेहनतीचे फळ म्हणजे आजचे वनभोजन. विद्यार्थ्यांना श्री *सुरेशजी बोरीकरजगी* यांच्याकडून खमंग एकदम मस्त *मसालाभात* देण्यात आले .

HTML img Tag Simply Easy Learning    

एकीकडे भोजनाची तयारी चालु असतांनाच दुसरीकडे गप्पा ,गाणी , गोष्टी यांना उधाण आलं होतं.लहानांच्या गाण्याच्या भेंड्या तर मोठ्यामध्ये कुस्ती व कबड्डीचे सामने रंगले होते.विद्यार्थ्यासाठी आजचा दिवस तर अविस्मरणीयच होता.ते हा दिवस चिरंतर आपल्या ह्रदयात साठवून ठेवतील यात तीळमात्र शंका नाही.

HTML img Tag Simply Easy Learning    

सेंद्रिय शेतीचे प्रणेते म्हणून पंचक्रोशीमध्ये ओळखले जाणारे श्री बसवराज बोरीकरजगी यांनी आपल्या पोल्ट्री फार्म ,दुग्ध व्यवसाय ,पशुपालन यासारख्या शेतीला जोड उद्योग कशी करावी याविषयी माहिती दिली . देशी गाईच्या मलमूत्रापासून सेंद्रिय खत कसे तयार करतात हे विद्यार्थ्यांना दाखविले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी याविषयी माहिती सांगितले त्याचप्रमाणे गांडूळ खतविषयी सविस्तर माहिती सांगितले.
या कार्यक्रमासाठी कन्नड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री राजशेखर कणमुसे, मराठी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ सुनीता पांढरे, श्री स्वामीनाथ स्वामी , श्री विजयकुमार भणगे, श्री पंडित गुरव ,श्री बशीर मुल्ला, श्री सैपन मुल्ला, श्री शिवाजी कदम ,श्री यल्लप्पा हडपद ,श्री अर्जुन उडगे ,श्री महादेव सुतार ,श्री संजयकुमार भोसले, श्री काशिनाथ पाटील, श्री जगदीश वग्गे, श्री रफिक मुजावर (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ), श्री लष्करे सर, श्री रेहमान अत्तार ,श्री शिवू गौडगाव, श्री इरेश स्वामी ,श्री श्रीशैल स्वामी सर ,श्री दौलतरत्न किरनळी, श्री इरफान मुजावर ,श्री इरफान शेख श्री इरेश हमाले ,श्री पिंटू वग्गे, श्री राजू स्वामी ,श्री गणेश कुलकर्णी (शिक्षण तज्ञ ) ,श्री विशाल शिंदे आधी मान्यवर उपस्थित होते.
वनभोजन कार्यक्रमासाठी *आवर्जून उपस्थित राहणारे* करजगी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय *श्री हरीशजी गायकवाड साहेब*…यांनी या कार्यक्रमाची स्तुती केली.
या प्रसंगी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर जमादार सर श्रीमती उर्मिला नरगिडे मॅडम , श्रीमती सुमित्रा वालीकर मॅडम श्रीमती ज्योती वाघोलीकर मॅडम ,श्रीमती पल्लवी मुरशिळे मॅडम, श्रीमती कलमदाणे मॅडम,श्री नागप्‍पा अळगी सर, श्री संगमेश्वर कोणदे सर ,श्री शांतप्पा शिंगे सर ,श्री लवा वग्गे ,श्री दादासाहेब खराटे सर गावातील तरूण मित्रमंडळी ही उपस्थित होती.

*वनभोजनासाठी आपला फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री बोरीकरजगी कुटुंबीयांचा मनःपूर्वक धन्यवाद व आभार*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group