हुर्डा पार्टीच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनी शाळेतील मित्रांचा मेळा भरला शेतात .
माजी विद्यार्थी मेळावा

हुर्डा पार्टीच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनी शाळेतील मित्रांचा मेळा भरला शेतात .


करजगी — बसवराज हाँयस्कूल करजगी 2003 बँच माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा भरला चक्क शेत शिवारात निमित्त होतं हुर्डा पार्टीचा मग काय तब्बल 20 वर्षानंतर शाळेतील मित्र मैत्रीणीनां भेटण्याचा आंनद वेगळाच असतो.
2003 बँच चे संतोष कोणदे,इस्माइल गोडीकर,श्रीकांत बिराजदार,धमेप्पा बेनुरे व रमेश माशाळे यांच्या संकल्पनेतून बँच मेळावा घेण्याचा ठरवले सगळ्यांना एकत्र करणे अवघड काम पण 20 वर्षांनी जो तो आपल्या क्षेत्रांत असेल यावेळी साथ लाभले ते सोशल मिडीया मुळे सर्व शाळेतील मित्रांना शोधणे सोपे गेले.

तंत्रज्ञानामुळे आज जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. याचे उदाहरण म्हणजे शालेय जीवनापासून दूर झालेले मित्र-मैत्रिणी तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. सोशल मीडिया या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. यातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करून यात साऱ्यांनी एकमेकांच्या सुख- दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.येणाऱ्या काळात गावातील शैक्षणिक उपक्रम बँच माध्यमातून करण्याचा निर्णय यावेळी घेतला.
मित्रांना शेतात गरमा गरम हुर्डाचा आस्वाद घेत सर्वजण शाळेतील आठवणी रमून गेले.यावेळी आवर्जून पोलिस क्षेत्रांत कार्यरत असलेले संजीवनी अंटद मँडम,कलशेट्टी मँडम व गायकवाड मँडम उपस्थित होते.प्रास्तविक इस्माईल गाडीकर यांनी केले.सूत्रसंचालन मयूर दंतकाळे व आभार संतोष कोणदे यांनी केले.
पुन्हा वारंवार भेटू आणि संपर्कात राहू म्हणत निरोप घेतला.जाताना 20 वर्षानंतर शाळेतील आठवणीचा आंनद चेहऱ्यावर दिसत होता.
