व्हीजेएनटी समितीचे प्रमुख आ.सुहास कांदे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक
आ.सुहास कांदे यांच्या समवेत व्हीजेएनटी समितीचे सदस्य आ.उमेश यावलकर,
आ.देवेंद्र कोठे, आ.प्रविण स्वामी, आ. अनिल मांगुळकर, आ.अमोल मिटकरी,
आ.धीरज लिंगाडे यांनीही घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२०/०८/२०२५)
महाराष्ट्र राज्य (व्हीजेएनटी) विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार सुहास कांदे यांनी आपले समिती सदस्य आमदार उमेश यावलकर, आमदार देवेंद्र कोठे, आमदार प्रविण स्वामी, आमदार अनिल मांगुळकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे यांच्या समवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत स्वामींचरणी नतमस्तक झाले. यावेळी मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांनी आ.सुहास कांदे व सर्व सदस्य आमदार महोदयांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
श्री.स्वामी समर्थाच्या दर्शनानंतर चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार सुहास कांदे, आमदार उमेश यावलकर, आमदार देवेंद्र कोठे, आमदार प्रविण स्वामी, आमदार अनिल मांगुळकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे या सर्व आमदार महोदयांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना आ.सुहास कांदे यांनी आज श्रावण महिन्यात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा योग आला ही मानसिक शांती करीता समाधानाची बाब आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने व मंदीर समितीचे प्रमुख महेश इंगळे-प्रथमेश इंगळे यांच्या आदरपुर्वक मानपानाप्रती कृतज्ञता व्यक्त केले. मंदीर समितीच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्याचा वारसा महेश इंगळे हे उत्तमरीत्या जतन करीत असल्याचे पाहून ही जतन करण्याची प्रवृत्ती युवा पिढीकरीता आदर्शवत असल्याचे मनोगत व्यक्त करीत देवस्थानच्या समितीच्या कार्यास व इंगळे कुटूंबियांच्या स्वामी सेवेप्रती शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, पो.नि.राजेंद्र टाकणे, महेश पाटील, सुनिल नंदीकोले व शासकीय सेवक उपस्थित होते.
फोटो ओळ – आ.सुहास कांदे, आ.उमेश यावलकर, आ.देवेंद्र कोठे, आ.प्रविण स्वामी, आ.अनिल मांगुळकर, आ.अमोल मिटकरी, आ.धीरज लिंगाडे या सर्वांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!