श्री सिध्देश्वर सार्वजनिक वाचनालयात चित्रकला स्पर्धा संपन्न
"स्पर्धेतून जिद्द निर्माण होण्यास मदत मिळते"---प्रा.डॉ. बिराजदार
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230724-WA0028-780x470.jpg)
श्री सिध्देश्वर सार्वजनिक वाचनालयात चित्रकला स्पर्धा संपन्न
———————————————
“स्पर्धेतून जिद्द निर्माण होण्यास मदत मिळते”—प्रा.डॉ. बिराजदार
सोलापूर दि.२४ विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली तर त्यांच्यात जिंकण्याची जिद्द निर्माण होते. मी यशस्वी होणार ही भावना रुजते.आत्मविश्वास निर्माण होतो यामुळेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो व्यक्तिमत्त्व बहरते असे विचार संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी श्री सिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रंथ तद्न्य पी.एन.पणिकर यांच्या स्मृती निमित्त राष्ट्रीय वाचन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल गुरुनाथ हत्तीकाळे यांनी केले. वाचनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली
अध्यक्षीय समारोप करतांना वाचनालयाचे संचालक श्रीशैल शिळ्ळे म्हणाले की, स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवली आहे त्यांना खूप शुभेच्छा देतो. चित्रकला स्पर्धेत. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वाचनालयातर्फे प्रशस्तीपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन.गौरविण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)