तुषार पाटील यांना अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तुषार पाटील यांना 'अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ जानेवारी रोजी नाशिक येथे पुरस्काराचे वितरण आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221226-WA0037-780x470.jpg)
तुषार पाटील यांना अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी तुषार पाटील यांना ‘अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. ८ जानेवारी रोजी नाशिक येथे पुरस्काराचे वितरण आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
नुकताच खान्देश हित संग्रामच्या नाशिक शाखेतर्फे तुषार पाटील यांना ‘अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. ८ जानेवारी रोजी नाशिक येथे युवा अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कवी संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजक सुनीता पाटील व स्वागताध्यक्ष गणेश पाटील यांनी सांगितले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
तुषार पाटील हे युवा कवी असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागात पीएच.डी.चे संशोधन करीत आहेत. तसेच ते सध्या एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्लीच्या क्षेत्रीय शिक्षा संस्थान, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
………………………
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
साहित्य क्षेत्रातील माझ्या छोट्याशा कामाची दखल घेत खान्देश हित संग्रामच्या नाशिक शाखेने मला ‘अहिराणी युवा प्रेरणा पुरस्कार’ जाहीर केला त्याबद्दल आनंद आहे.
– तुषार पाटील
………………………