श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

आजीची अपुर्ण इच्छा नवदाम्पत्यांनी पुर्ण केला..

स्वामीचरणी माशाळे परिवाराने देणगी दिली

आजीची अपुर्ण इच्छा नवदाम्पत्यांनी पुर्ण केला..

स्वामीचरणी माशाळे परिवाराने देणगी दिली

====================
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*करजगी ता.अक्कलकोट येथील श्रीमती रेवणव्वा माशाळे (वय ८५ वर्षे) यांचे ३ डिसेंबर रोजी (पतींच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी) प्रतिमेस वंदन करतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तत्पूर्वी सकाळी उठलेल्या रेवणव्वा यांनी स्वामींच्या अन्नछत्रमध्ये असंख्य भाविक प्रसाद घेतात, त्याठिकाणी देणगी अर्पण करा असा मानस व्यक्त केला. अन् आजीच्या मृत्यूनंतर माशाळे कुटुंबीयांनी नवदंपत्यासह स्वामी चरणी देणगी अर्पण करून आजीची इच्छा पूर्ण केली.*

करजगी येथील गुड्डद बसवराज महास्वामीजी यांचे निस्सीम भक्त असलेले स्व.शिवबसप्पा माशाळे व स्व.रेवणव्वा माशाळे हे दांपत्य एकाच तारखेला तीन वर्षांच्या अंतराने म्हणजेच ३ डिसेंबर रोजी मयत झाले होते.हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल.घरी रोहितचे लग्नकार्य ठरले होते. मात्र आजीच्या निधनानंतर कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता माशाळे कुटुंबाने साध्या पद्धतीने उरकून काढला. आजीची अपूर्ण इच्छा पूर्ण करत माशाळे कुटुंबांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अकरा हजार रुपयांची देणगी दिली.

याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने नवदंपत्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अरविंद शिंदे, मनोज निकम, प्रशांत पाटील, शंभूलिंग अकतनाळ, विनोद माशाळे, सुलोचना सुरेश माशाळे, ललिता माशाळे, रोहीत माशाळे, पुष्पा माशाळे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button