महेश इंगळेंचे पुढील जीवन वाटचाल फलदायी
अमरावतीचे प्रसिद्ध भविष्यकार आचार्य सागर महाराजांचे प्रतिपादन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG-20221226-WA0043-780x470.jpg)
महेश इंगळेंचे पुढील जीवन वाटचाल फलदायी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अमरावतीचे प्रसिद्ध भविष्यकार आचार्य सागर महाराजांचे प्रतिपादन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
प्रतिनिधी अक्कलकोट, कोणतेही धर्मस्थळ असो तेथील व्यवस्थापन पाहणारे प्रमुख प्रतिनिधी हे अत्यंत नम्र व संयमी असणे गरजेचे आहे, कारण भारतासारख्या भक्तीप्रधान देशात आज धार्मिक स्थळांवर भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामध्ये अनेक स्वभावाचे भक्तगण धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. सर्वांचे विचार सारखे असतीलच असे काही नाही. त्यामुळे या धार्मिक स्थळांवर जे व्यवस्थापन पाहणारे प्रमुख प्रतिनिधी असतात त्यांना अत्यंत नम्रतेने व सेवाभावी वृत्तीने सर्वांना सेवा देणे गरजेचे असते. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीचे सन्माननीय चेअरमन महेश इंगळे यांच्या भेटीचा योग आला. एक संयमी, सुसंस्कृत, नम्र व्यक्तिमत्व त्यांच्या वर्तनातून मला जाणवले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सारख्या भारतातील महत्त्वाच्या देवस्थानच्या चेअरमनपदी महेश इंगळे यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची अत्यंत गरज होती, ती त्यांच्या कार्यातून व मंदिर समितीच्या प्रमुख पदातून पूर्ण झालेली आहे. कारण असंख्य स्वामीभक्त या देवस्थानाला भेट देऊन स्वामींचे दर्शन घेत असतात. या भाविकांची स्वामी भक्ती व्यक्त करण्याची नानाविध तरा असतात. देवस्थानमध्ये अशा स्वामी भक्तांचे मानसिक समाधान होणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या सर्व कार्याकार्यास महेश इंगळे यांचे संयमी, नम्र व सुसंस्कृत व्यक्तिमत्व योग्य दिशा दाखवणारी ठरत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रतेने अनेक भाविकांच्या मनात त्यांचे आदर स्थान निर्माण झालेले आहे. या आदरप्रित्यर्थ अनेक भाविकांच्या शुभकामना त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे महेश इंगळे यांचे या पुढील जीवन वाटचाल हे फलदायी असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे प्रसिद्ध राष्ट्रीय भविष्यकार आचार्य सागर महाराज देशमुख यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आचार्य सागर महाराज देशमुख बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी महेश इंगळे यांनी अत्यंत तळमळीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अनेक कार्याची धुरा सेवाभावी वृत्तीने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांचे कार्य उत्तरोत्तर वृद्धिगत होऊन प्रचंड मोठ्या स्वामी सेवेची संधी त्यांना जीवनात लाभावी असे ही मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – राष्ट्रीय भविष्यकार सागर महाराज देशमुख व कुटूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)