हमाल ते थेट लोकनियुक्त सरपंच युवराज ठाकरे यांची प्रेरणादायी कहाणी
जिद्द, चिकाटीचा विजय; मोलमजुरी करणारा हमाल आज सरपंचपदी; युवराज ठाकरेंचं यश

जिद्द, चिकाटीचा विजय; मोलमजुरी करणारा हमाल आज सरपंचपदी; युवराज ठाकरेंचं यश
: राजकारणात येण्यासाठी खूप पैसा, तामझाम लागतो असं म्हटलं जातं पण याला अपवाद ठरलेत नवनियुक्त सरपंच युवराज ठाकरे. युवराज ठाकरे अगोदर व्यापाऱ्याकडे हमाली काम करायचे त्यानंतर त्याच ठिकाणी मुनीम म्हणून कामाला सुरवात केली. पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवराज यांची गावातील विविध प्रश्नांवर काम करण्याची इच्छा पाहून युवकांमध्ये त्याचा मोठा जनसंपर्क झाला आणि त्याला साथ लाभली.
नंदुरबार : राजकारणात फक्त श्रीमंतांचे स्थान असतं, अशी सर्वसामान्यांचा समज आहे. राजकारणात येण्यासाठी खूप पैसा, तामझाम लागतो असं म्हटलं जातं पण याला अपवाद ठरलेत नवनियुक्त सरपंच युवराज ठाकरे. एका व्यापाऱ्याकडे हमालीचं काम करणाऱ्या या पठ्ठ्यानं सरपंचपद मिळवलंय. युवराज ठाकरे हे व्यापाराकडे हमाली काम करायचे त्यानंतर त्याच ठिकाणी मुनीम म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली आणि हीच मेहनत त्यांच्या कामी आली.
युवराज ठाकरे अगोदर व्यापाऱ्याकडे हमाली काम करायचे त्यानंतर त्याच ठिकाणी मुनीम म्हणून कामाला सुरवात केली. पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवराज यांची गावातील विविध प्रश्नांवर काम करण्याची इच्छा पाहून युवकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क झाला त्यांना साथ लाभली. गावातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली युवराज हे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ४०३८ पैकी २२०० मतं घेऊन ते गावाचे जनतेतून थेट लोकनियुक्त सरपंच झाले.
