मा.गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी घेतले समर्थांचे दर्शन
वटवृक्ष मंदिरातील बदल पाहून व्यक्त केला आनंद

मा.गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी घेतले
समर्थांचे दर्शन

वटवृक्ष मंदिरातील बदल पाहून व्यक्त केला आनंद

(प्रतिनिधी अक्कलकोट,
देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री तसेच राजकीय क्षेत्रात अनेक पदे यशस्वीपणे भूषविणारे सोलापूरचे सुपुत्र सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व श्री स्वामी समर्थांची आरती केली.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी सुशीलकुमार शिंदे साहेबांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना श्रीयुत शिंदे यांनी मी व माझे संपूर्ण कुटुंबीय हे असीम स्वामीभक्त आहेत. ज्या ज्या वेळी अक्कलकोटला येण्याचा प्रसंग येतो त्यावेळी शिंदे कुटुंबीय हे आवर्जून वटवृक्ष मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतात. आज अनेक दिवसानंतर स्वामी दर्शनाचा योग आल्याने व स्वामींची अत्यंत सुंदर मुर्ती पाहून आनंद झालेला आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील गाभारा सुशोभीकरण, व परिसर नुतनीकरण नयनरम्य विद्युत रोषणाई इत्यादी पाहून आपल्याला अत्यंत आनंद झाला असल्याचे मनोगत व्यक्त केले व वटवृक्ष मंदिर समितीच्या व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक चेतन नरोटे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, अक्कलकोट काँग्रेस शहराध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, सिद्धाराम भंडारकवठे, अक्कलकोट पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, माजी नगरसेवक रामचंद्र समाणे, मल्लीकार्जुन पाटील, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी आदींसह काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ – सुशीलकुमार शिंदे साहेबांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.
