अमेरिकन दाम्पत्याला भावले स्वामी समर्थ नूतन वर्षाच्या मुहूर्तावर विदेशी स्वामी भक्तांचीही उपस्थिती.
भारतीय संस्कृती खूपच महान - दत्तात्रय
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230102-WA0036-780x470.jpg)
भारतीय संस्कृती खूपच महान – दत्तात्रय
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
नूतन वर्षाच्या मुहूर्तावर विदेशी स्वामी भक्तांचीही उपस्थिती.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
भारतवासी व भारतीयांची संस्कृती खूपच महान असून जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीची विशेष ओळख आहे.भारतीय संस्कृतीचा अमेरिकेन नागरिकांनाही अभिमान आहे. पश्चिमात्य संस्कृती प्रमाणे भारतातही नवीन वर्षाचे स्वागत होते, परंतु भारतीय संस्कृतीला विसंगती न देत भारताच्या संस्कृतीचे व आध्यात्माचे आचरण जगासमोर मांडणारे नागरिक व भाविक आजही भारतात आहेत. हे येथील वैशिष्टय, येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या निमित्ताने साजरे होणारे धार्मिक कार्यक्रम पाहून आपल्याला जाणवल्याचे मनोगत अमेरिकेतील दाम्पत्य दत्तात्रय आणि रामादेवी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिल्यानंतर नवीन वर्षानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचे आशीर्वाद घेतले. प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी दत्तात्रय बोलत होते. पुढे बोलताना दत्तात्रय यांनी येथील नागरिकांची भक्ती जगाने आदर्श घेण्यासारखी आहे. वटवृक्ष मंदिरात ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी नूतन वर्षानिमित्त संपन्न होणारे धार्मिक कार्यक्रम पाहून भारतातील आध्यात्माचे व भक्ती प्रेमाचे दर्शन पाहून मन धन्य झाले. इतक्या भक्तिमय वातावरणात नूतन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर निश्चितच वर्षभर सुख समृद्धी लाभत असेल अशी आशा व्यक्त करून नूतन वर्षानिमित्त मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांचा आदर्श जगाने घेण्यासारखा आहे, त्यामुळे भारतीय संस्कृती ही जगात खूपच महान असल्याचे मनोगतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, लखन गवळी आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – विदेशी स्वामीभक्त दत्तात्रय व रामादेवी यांचा मंदिरात सत्कार केल्यानंतर महेश इंगळे यांनी भेटीदरम्यान घेतलेले छायाचित्र.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)