ग्रामीण घडामोडी
इंगळे-भोसलेंच्या हस्ते गवंडी प्लंबिंग अँड हार्डवेअरचे उद्घाटन
नगरसेवक बसलिंगप्पा खेडगींच्या अधिपत्याखाली संपन्न झाला उद्घाटन सोहळा

- इंगळे-भोसलेंच्या हस्ते गवंडी प्लंबिंग अँड हार्डवेअरचे उद्घाटन
- नगरसेवक बसलिंगप्पा खेडगींच्या अधिपत्याखाली संपन्न झाला उद्घाटन सोहळा
- (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.६/१/२३) – येथील बस स्टॅन्ड समोरील हसापूर रोडवर गवंडी प्लंबिंग अँड हार्डवेअर या नूतन दुकानाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. नगरसेवक व अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या सोहळ्यात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते गवंडी प्लंबिंग व हार्डवेअरचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी महेश इंगळे व अमोलराजे भोसले यांनी श्री वटवृक्ष देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून प्रोप्रा.श्रीशैल गवंडी, राहूल व राकेश गवंडी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. तत्पूर्वी गवंडी प्लंबिंगच्या वतीने नगरसेवक बसलींगप्पा खेडगी यांनी महेश इंगळे व अमोलराजे भोसले यांचाही शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मान केला. यावेळी नगरसेवक खेडगी यांचा चंद्रकांत गवंडी यांनी शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मान केला. याप्रसंगी प्रकाश भंडारी, सुहास कोलारकर, नागनाथ माशाळकर आदिसह अन्य मान्यवरांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शहरातील अनेक अभियंतांनी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी वैजनाथ मुकडे, काका सुतार, इरण्णा पाटील, आप्पाशा गवंडी, व्यंकप्पा गवंडी, चंद्रकांत गवंडी, श्रीमंत चेंडके, संतोष जमगे, शिवशरण इचगे, शशिकांत भासगी, चंद्रकांत सोनटक्के, प्रकाश टाके, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, परमेश्वर शिंदे, संतोष जमगे, स्वामीनाथ चव्हाण, प्रोप्रा राहुल गवंडी, राकेश गवंडी, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास बहिरेवार, तम्मा शेळके, लक्ष्मण गवंडी, सुनील गवंडी, संतोष गवंडी, देविदास गोबरे, गोकुळ गवंडी आदींसह अनेक मान्यवर व समस्त समाज बांधव उपस्थित होते. उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता इरण्णा गवंडी, अमोल गवंडी, संतोष माने, राहुल गवंडी, राकेश गवंडी, श्रीशैल गवंडी, आदींसह मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.
- फोटो ओळ – गवंडी प्लंबिंग अँड हार्डवेअरच्या उद्घाटन प्रसंगी श्रीशैल,राहूल, राकेश गवंडी यांचा सत्कार करताना महेश इंगळे, अमोलराजे भोसले, बसलिंगप्पा खेडगी व अन्य दिसत आहेत.