ग्रामीण घडामोडी

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम शुभारंभ

तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील

अक्कलकोट, दि.13 : (प्रतिनिधी)
तालुक्यातील ऊस क्षेत्राचे सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाज़ूळव झाल्यास यंदाचा गळीत हंगाम चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

ते स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना दहिटणेचे 14 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते 14 व्या गळीत हंगाम मोळी टाकण्याचे कार्यक्रम करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, संचालक संजीवकुमार पाटील, अप्पासाहेब पाटील, दिलीप पाटील, महेश पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक मुलगे, शिवमूर्ती स्वामी, शिवानंद कोरपे, महेश हिंडोळे, अप्पासाहेब बिराजदार, सिध्दप्पा गड्डी, सुरेश झळकी, देवेंद्र बिराजदार, सुनिल बंडगर, अंबण्णा भंगे, दिलीप शावरी, राजकुमार बंदीछोडे आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे बोलताना सिद्रामप्पा पाटील म्हणाले, कारखाना बंद पाडण्यासाठी कोण काय कारस्थान केले, याच्या खोलात मला जायचे नाही. शेतकर्‍यांच्या हितासाठी माझे वैरत्व कमी करुन स्वत:ची इस्टेट गहाण ठेवून कारखाना सुरु करीत आहे. मात्र कारखाना चालु करण्यासाठी उशीर झाल्यामुळे तालुक्यातील ऊस अत्यंत कमी प्रमाणात राहिलेला आहे. तरीही जहिराबाद येथील व तालुक्यातील उर्वरित ऊसांची सर्व्हे करुन यंत्रणाची जुळवाजुळव करुन स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालु करण्याचा माझा मानस असून यावर लवकरात लवकर विचार विनिमय होवून निर्णय घेणार आहे. यंदाचा गळीत हंगाम चालु होत नसेल, पुढील गळीत हंगाम जोमाने चालु करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बोलताना म्हणाले, गेल्या आठ वर्षापासून बंद असलेली स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चालु करण्यासाठी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी स्वत:चे स्थावर मालमत्ता गहाण ठेवून शेतकर्‍यांच्या हितासाठी जिद्दीने चालु करीत आहेत. हे तालुकावासियांसाठी भूषणावह असून मला अडचणीच्या काळात मदतीचे हाक देणारे सिद्रामप्पा पाटील यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी कटीबद्द असल्याचे सांगून आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका हे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील जे निर्णय घेतील त्या पध्दतीने पार पाडणार असल्याचे आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी बोलताना म्हणाले, स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा 14 वा गळीत हंगाम चालु करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील हे त्यांचे वय 80 असले तरी वीस वर्षाच्या युवकाला लाजवेल असे कार्य करीत असून स्वामी समर्थ सहकारी कारखाना स्थापन होवून 14 वर्षे लोटले तरी तत्कालीन संचालक मंडळाला कारखाना चालु करता आले नव्हते. त्यावेळी सिद्रामप्पा पाटील यांनी स्वामी समर्थ साखर कारखाना हातात घेवून सक्षमपणे चालवून देशात प्रथम क्रमांक मिळवून दिला. सदरील कारखाना शेतकर्‍यांचा हक्काचा असून मधील काळात काही कारणामुळे आठ वर्ष बंद पडले होते. ते चालु करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी स्वत:ची स्थावर मालमत्ता गहाण ठेवून कारखाना चालु करु पाहत आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावून ऊस पुरवठा करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, अभियंता, हणंतराव रेड्डी, शिवसिध्द बुळ्ळा, बाबुशा कोरपे, अण्णाराव याबाजी, भिमाशंकर विजापुरे, सिध्दाराम बाके, जयशेखर पाटील, अप्पु कवटगीमठ, मल्लिनाथ देशेट्टी, शिवानंद पेडसंगे, सुधीर मचाले, प्रकाश पाटील, रमेश कवटगी, संजय याबाजी, सचिन थोरात, दयानंद पाटील, बसवराज माशाळे, प्रविण मगदूम, दिलीप मोरे, संतोष माशाळे, मन्सूर मुल्ला, अप्पू परमशेट्टी, बाबा टक्कळकी, कलप्पा गड्डी, निलप्पा विजापुरे, रामगोंडा बिराजदार, श्रीमंत कुंटोजी, अरविंद ममनाबाद, परमेश्वर झळकी, महादेव पाटील, आमसिध्द पुजारी, मल्लिनाथ नागशेट्टी, महेश पाटील, शिवानंद बाके, सहा.शेती अधिकारी खोबरे, प्रदीप जगताप, उमाकांत वाघमोडे, व्यंकटेश मंगरुळे, बसवराज निंबाळे, रवी रसनभैरे, अशोक वर्दे, जगदीश बिराजदार, अमर पाटील, एम.जी.पाटील, पंडित चौधरी, रमेश पुजारी, वसीम मुल्ला यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक शिवयोगी स्वामी यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वसुली अधिकारी मल्लिनाथ दुलंगे यांनी तर आभार मल्लिनाथ भासगी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button