जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन साजरा
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_9555-780x470.jpg)
जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
नवी मुंबई – वैभव पाटील
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
सामाजिक क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेल्या मुंबईच्या जॉय सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी दादर पूर्व येथील आरजु सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक तसेच मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉ. राम नेमाडे, अविनाश दौंड कामगार नेते, शिक्षक नेते जनार्दन जंगले, दैनिक आपलं महानगर चे संपादक संजय सावंत, आरोग्य सेवेतील अधिकारी डॉ अविनाश भागवत, जॉय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक उत्तरदायित्व निभावणाऱ्या सामाजिक घटकांचा, पत्रकार, वृत्तपत्रलेखक, आदर्श शाळा तसेच संस्थेच्या सभासदांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थापक गणेश हिरवे यांनी संस्थेची निर्मिती, वाटचाल, भूमिका व आगामी संकल्पनांविषयी माहिती दिली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
विचारमंचावरील सर्वच प्रमुख अतिथींनी जॉय ऑफ गिव्हिंग करत असलेल्या कार्याचा गौरव करत संस्थेमध्ये निस्वार्थीपणे एक टीम म्हणून करत असलेल्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या सर्व सभासदांसह, पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीने सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आरसा दाखवणाऱ्या कार्य अहवालाचे तसेच टी-शर्टचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारी कविता वैभव पाटील यांनी यावेळी उपस्थितांसमोर सादर केली. डॉ अविनाश भागवत यांनी पुढील महिन्यात होत असलेल्या आपल्या मुलाच्या लग्नकार्यातून बचत करत आर्थिक मदतीचा धनादेश याप्रसंगी संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केला. यावेळी आदर्श शाळा म्हणून बाल विकास विदयामंदिर, जोगेश्वरी (पूर्व), पंत वालावलकर विदयालय, कुर्ला (पूर्व), अस्मिता विदयालय, जोगेश्वरी (पूर्व), आनंद रात्र विदयालय, सांताक्रुज, सरस्वती गणपत पाटील विदयालय,वज्रेश्वरी-केळठन, के.जी. पाटील विदयालय,देवघर,वाडा,जि.पालघर, एम.डी. केणी विदयालय, भांडुप, संदेश विदयालय व ज्युनिअर कॉलेज, विक्रोळी, श्री समर्थ विदयालय, जोगेश्वरी (पूर्व), भारत विदयालय, न्हावी, जळगाव, जिल्हा परिषद शाळा, काटी, जि. पालघर या शाळांना संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. तसेच समीर खाडीलकर, पंकजकुमार पाटील संपादक, आदर्श वार्ताहर, गुरुनाथ तिरपणकर, अनंत बोरसे, मुनार खान, संपादक, झुंजार केसरी, विश्वनाथ पंडीत, पूनम पाटगावे, मिडीया वार्ता, रहिफ छाची, संपादक, डहाणू मित्र, दत्ता खंदारे संपादक, भगवे वादळ, शांताराम गुडेकर, प्रेरणा गावकर, मंगेशकुमार हिरे संपादक, सच्ची पुकार, सुनिल धनगर संपादक, अहिल्या न्यूज, उमाकांत आरोलकर, संपादक, सिंधू वैभव, शरद बनसोडे, प्रमोद तरळ, लक्ष्मणराव खटके संपादक, प्रगल्भनायक, नितीन खेतले, मुंबई मित्र, वैभव मोहन पाटील, राजेंद्र मांडवकर संपादक, दै गुहागर सत्ता, शैलेस सणस संपादक, आदर्श रायगड, धोंडप्पा नंदे संपादक, गावगाथा, विशाल नाईक,निसार अली, उदय सांगळे संपादक, आपला समाज मार्गदर्शक, विश्वनाथ शरणागत संपादक, किर्ती न्यूज चॅनल, सेजल पुरवार, साम टिव्ही, मिर्झा गालीब मुजावर संपादक, तुफान क्रांती, ईश्वर महाजन संपादक, मराठी लाईव्ह न्यूज आदींनादेखील पत्रकारितेतील उत्तुंग
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या सर्व सभासदांना एकत्र आणून तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या गुणारत्नांना गौरवत संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगत उपस्थित सर्वांनीच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार हिरवे सरांनी मानले. उपस्थित सर्वांसाठी यावेळी सुग्रास भोजनव्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता शेवटी राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासठी जॉय च्या सर्व कार्यकर्त्यानी खूप मेहनत घेतली.