शनि अमावस्येनिमित्त शनिवारी गौडगांवच्या जागृत मारूती मंदिरात धार्मिक कार्यक्रम
अक्कलकोट तालुक्यातील गाैडगांव येथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात शनि अमावस्येनिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230119_110540-464x470.jpg)
शनि अमावस्येनिमित्त शनिवारी गौडगांवच्या जागृत मारूती मंदिरात धार्मिक कार्यक्रम
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट तालुक्यातील गाैडगांव येथील दक्षिण मुखी जागृत मारूती मंदिरात शनि अमावस्येनिमित्त शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यानी दिली आहे.
नव वर्षाच्या पहिल्या महिन्याची अमावस्या २१ जानेवारी २०२३ रोजी शनिवारी येत आहे.ही अमावस्या शनि अमावस्या म्हणून ओळखली जाते. शनिदोषाचा उपायही शनि अमावस्येच्या दिवशी केला जातो. असे मानले जाते की या शनि अमावस्येला मारूतीचे विधि व पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि शुभ फळ देतात.आयुष्यात येणारे संकट दूर होतात.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
यासोबतच ज्या लोकांच्या कुंडलीत साडेसाती आणि शनीची पिडा चालू आहे, त्यांनी या दिवशी मारूतिचे पूजन आणि उपाय करून शनीची अशुभता टाळता येते.या दिवशी हा उपाय प्रभावी असल्याचे सांगितले जाते.
शनि अमावस्येनिमित्त शनिवारी पहाटे ३ वाजता मारूतीचे महारूद्राभिषेक,
अभिषेक,५ वाजता नवग्रह पुजा,शनिपुजा तर ६ वा.होमहवन व यज्ञचा कार्यक्रम होणार आहे.या महाअभिषेक व होमहवमचा लाभ घेत भक्तांना घेता येणार आहे. शनिवारी दुपारी १२ ची विशेष महाआरतीचा कार्यक्रम पार पडणार असुन रांगेत प्रथम उभे असलेल्या भक्तांना या महा आरतीचा मान मिळणार आहे. त्यांनतर दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांना जागृत मारूतीचे हानुमान चालीसा पुस्तक व हनुमान फोटो देण्यात येतील.शनि अमास्येनिर्मित राज्य व पर राज्यातुन येणाऱ्या भाविक भक्तांना अन्नछत्र मंडळात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम चालु राहणार आहे.तरी मारूती भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहान मंदीराचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
चौकट:-
जिल्हा कलबुर्गी ता.आळंद येथील खजुरी गावचे उदयोजक तथा मारूती भक्त मिथुन अप्पाराव कलमाने,रविंद्र वानेगांव,किरण सदाशिव भंगरर्गी यांच्या वतिने शनि अमावस्याच्या औचितसाधून जागृत मारूती अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)