
*कै बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठान वतीने दिवळी फराळ वाटप*……
आपुलकीचं नातं आणि सामाजिक बांधिलकी जपत “कै बाळासाहेब जिरगे” प्रतिष्ठान मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
सोलापूर भाजयुमो सदस्य इरय्या स्वामी यांच्या शुभहस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्याचं काम कै बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठान करताहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.
लोकोपयोगी आणि लोककल्याणकारी कामाचा एक चांगला पायंडा कै बाळासाहेब जिरगे प्रतिष्ठान मित्र परिवाराने पाडला असून हे काम अत्यंत प्रशंसनिय आहे.
यावेळी ओम जिरगे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की दिवाळी म्हणजे आनंदाचा सण आणि दुसरयाला देण्यातच खरा आनंद आहे. केवळ स्वत: प्रकाशमान व्हायचे नाही तर स्वत: बरोबर इतरांनाही प्रकाशमान करण्याचा पर्व म्हणजेच दिवाळी आणि याप्रमाणेच दुसरयांना प्रकाशमान करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
मुकबंधीर शाळा अक्कलकोट याठिकाणी दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं.
यावेळी सोलापूर भाजयुमो सदस्य इरय्या स्वामी, ओम जिरगे, श्रीकांत व्हनखरचे, प्रज्वल पोतदार, विशाल जोगदे आदी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
