स्वामी दर्शनाच्या तिर्थाने ह्रदय मंदीर पवित्र झाले – खा.प्रतापराव पाटील
उत्कृष्ट नियोजनामुळे आम्हालाही मन प्रसन्न करणारे स्वामी दर्शन लाभले, आणि स्वामी दर्शनाच्या तीर्थाने आमचेही हृदय मंदिर पवित्र झाले असल्याचे मनोगत नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230122-WA0024-680x470.jpg)
स्वामी दर्शनाच्या तिर्थाने ह्रदय मंदीर पवित्र झाले – खा.प्रतापराव पाटील
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महेश इंगळे हे नेहमीच भाविकांना उत्कृष्ट स्वामी दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात मग्न असतात. त्यांच्या प्रयत्नातून भाविकांना सुलभ स्वामी दर्शनाचा लाभ होऊन स्वामी दर्शनाच्या तीर्थाने भाविकांचे हृदय मंदिर पवित्र होत आहे. याचे सर्व श्रेय महेश इंगळे यांनाच असून आज त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आम्हालाही मन प्रसन्न करणारे स्वामी दर्शन लाभले, आणि स्वामी दर्शनाच्या तीर्थाने आमचेही हृदय मंदिर पवित्र झाले असल्याचे मनोगत नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक विनोद घुगे,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, आकाश शिंदे, लखन गवळी आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)