श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश जयंती न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा

गणेश जन्म सोहळा विशेष

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेश जयंती न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व विश्वस्त अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. त्या नंतर श्रींचा पाळणा उत्सव महिलांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळ पासून रामकृष्णहरी वारकरी मंडळ समता नगर भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. पाळणा कार्यक्रमा नंतर आरती, महाप्रसाद, दुध उपस्थित भक्तांना देण्यात आले. विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमनाथ कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने संपन्न झाली.
न्यासाच्या परिसरात शमीवृक्षाखाली गेल्या ३२ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमी विघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.
या कार्यक्रमास न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रत्नमाला मचाले, स्मिता कदम, उज्वला भोसले, पल्लवी कदम, राजश्री माने, ललिता वाकडे, क्रांती वाकडे, स्वप्ना माने, पल्लवी नवले, स्वाती निकम, सुवर्णा घाडगे, छाया पवार, रुपा पवार, लता कुलकर्णी, उषा नकाते, यांच्या सह अप्पा हंचाटे, आतिष पवार, निखील पाटील, प्रवीण घाडगे, अमित थोरात, स्वामीनाथ बाबर, रमेश हेगडे, बाळासाहेब घाडगे, प्रसाद हुल्ले, गोरख माळी, बसवराज क्यार, मुन्ना कोल्हे, गणेश लांडगे, पिट्टू साठे, संभाजीराव लोंढे, गोविंदराव शिंदे, बाबुशा महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, राहुल इंडे, राजू सिरसट, राजू पवार, महांतेश स्वामी, विशाल घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हांजगे, पप्पू वाकडे, यांच्या सह स्वामी भक्त बहु संख्येने उपस्थित होते.
चौकट
मंगळवारी हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले मार्गदर्शनाखाली न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांकरिता विविध उपक्रमाच्या माध्यमातून संस्था सतत कार्यरत आहे. मंगळवारी सायंकाळी न्यासाच्या परिसरात असलेल्या शामियाना मंडपात सखी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. या वेळी शेकडो महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button