स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात श्री गणेश जयंती भक्तीभावात साजरी

गणेश जन्म सोहळा विशेष

अक्कलकोट वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात श्री गणेश जयंती
भक्तीभावात साजरी

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रतिनिधी (अक्कलकोट) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने मंदिरातील पुरातन कालीन गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी श्री गणेशास पंचामृत अभिषेक करण्यात आले. तदनंतर दुपारी १२: ०५ वाजता सेवानिवृत्त पोलीस महासंचालक संजय बर्वे व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते, पुजारी मंदार महाराज यांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा व आरती करून गणेश जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अनेक भाविक उपस्थित होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने उपस्थित हजारो भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. गणेश जयंतीचे औचित्य साधून दिवसभर हजारो भाविकांनी श्री गणेशाचे व स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट पोलीस ठाण्याचे पीआय जितेंद्र कोळी, पीएसआय चंद्रकांत पुजारी, प्रथमेश इंगळे, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, गजानन शिंदे, दीपक जरिपटके, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर,विपुल जाधव, श्रीपाद सरदेशमुख, सागर गोंडाळ, महेश मस्कले, गिरीश पवार, महादेव तेली, संतोष पराणे आदिसह मंदिर समितीचे सेवेकरी व गणेशभक्त, स्वामीभक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – गणेश जयंती निमित्त जन्मोत्सवानंतर आरती करताना महेश इंगळे, संजय बर्वे, मंदार पुजारी व अन्यदिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button