श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अक्कलकोट श्री स्वामींच्या पालखी परिक्रमा पुणे शहर जिल्ह्यात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यत विविध ठिकाणी मुक्काम स्वामी भक्तांनी दर्शचा लाभ घ्यावा ..

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या न्यासाचे वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन

अक्कलकोट श्री स्वामींच्या पालखी परिक्रमा पुणे शहर जिल्ह्यात 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यत विविध ठिकाणी मुक्काम स्वामी भक्तांनी दर्शचा लाभ घ्यावा ..

HTML img Tag Simply Easy Learning    

पुणे — श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट ह्या न्यासाचे वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा सबंध महाराष्ट्रातील गावोगांव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परिक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दुरवरच्या अबालवृध्द, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामींच त्यांच्या गावी येत आहेत.
श्री समर्थ स्वामींच्या साधु-संतत्त्वाची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचिती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जीवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गांवी येत आहे. श्री स्वामींच्या मूळस्थान श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इच्छेनेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) स्थापन झाले असून येथे दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्रातर्फे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडाविषयक, आपदग्रस्तांना मदत, आरोग्य विषयक इ. विविध कार्यक्रम राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते.
मंडळाच्या मालकीच्या जागेत भव्य असे यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास ह्या निवासी इमारती कार्यरत असून महाप्रसादगृह ध्यानधारणा मंदिर, मंगलकार्यालय, इ. सुमारे ४५ कोटी खर्चाचा मोठा प्रकल्प उभा राहत आहे हे सर्व श्री स्वामींच्या कृपा आशिर्वादाने होत आहे.
या बांधकाम आणि अन्नदानाच्या धर्मकार्यात भाविकांनी सढळ हाताने मदत करून श्री स्वामी चरणी आपली सेवा रूजू करावी.
आपला नम्र
जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले
संस्थापक अध्यक्ष
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button