वागदरीत संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी ; कुमारी प्रतिक्षा सुभाष नंदे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्या बदल सत्कार …
वागदरीत संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी ;
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230218-WA0051-780x470.jpg)
वागदरीत संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी ; कुमारी प्रतिक्षा सुभाष नंदे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्या बदल सत्कार …
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वागदरी — वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे आराध्य दैवत, बसवशरण साहित्याचे रक्षण करणारे संत कक्कय्या महाराज यांची जयंती वागदरीत समाज बांधवानी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.वागदरी येथील संत कक्कय्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संत कक्कय्या महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समाजातील सर्व जेष्ठ मंडळी केले.श्रीमंत सोनकवडे,सिद्राम सोनकवडे,भिमशा सोनकवडे,रामचंद्र सोनकवडे,परमेश्वर मोहरकर,सिद्राम मोहरकर,परमेश्वर चौगुले,गंगाराम सोनकवडे,लाडप्पा चौगुले व लक्ष्मण सोनकवडे सुभाष नंदे उपस्थित होते.यावेळी अनेक समाज बांधवानी मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी कुमारी प्रतिक्षा सुभाष नंदे हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या बदल माजी जि.प.सदस्य सिंधूताई सोनकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे सह अनेक महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधीर सोनकवडे यांनी केलं व आभार लक्ष्मण सोनकवडे यांनी मानलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केलं .सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यात नरशिंग मोहरकर,मल्लिनाथ सोनकवडे,पंचप्पा सोनकवडे,रोहित सोनकवडे,प्रदीप सोनकवडे,निलप्पा नंदे,ऋषीकेश नंदे,महादेव नंदे,प्रशांत वागदरीकर,नितीन चौगुले,परमेश्वर कटके,यांनी परिश्रम घेतला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)