मॅरेज ॲनिवर्सरी निमित्त सचिन कल्याणशेट्टीनी सपत्नीक घेतले स्वामींचे दर्शनमहेश इंगळे यांनी शुभेच्छांसह स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला सन्मान.
महेश इंगळे यांनी शुभेच्छांसह स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला सन्मान.

मॅरेज ॲनिवर्सरी निमित्त सचिन कल्याणशेट्टीनी सपत्नीक घेतले स्वामींचे दर्शन
महेश इंगळे यांनी शुभेच्छांसह स्वामींचे कृपावस्त्र देऊन केला सन्मान.

विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येवून सपत्नीक स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सौ व श्री सचिन कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महेश इंगळे यांच्याशी आपले अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. त्यांच्या शुभेच्छा आमच्या नेहमी पाठीशी आहेतच व पुढील राजकीय व व्यक्तिगत जीवन वाटचालीस स्वामी समर्थांचे आशीर्वादही आपणास अत्यंत मोलाचे असल्याने आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सपत्निक येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन व आशीर्वाद घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, मनोज कल्याणशेट्टी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, संजय पवार, बालाजी पाटील, विपुल कडबगावकर, सिध्दाराम टाके इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – सौ व श्री सचिन कल्याणशेट्टी यांचा वटवृक्ष मंदिर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे मिलन कल्याणशेट्टी दिसत आहेत.
