शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे श्रद्धेने केलेल्या पूजनाने भगवंताची कृपा होते; कोटी लिंगार्चन ही विशेष बाब’ पू.श्रीमद शंकराचार्य नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज
शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे श्रद्धेने केलेल्या पूजनाने भगवंताची कृपा होते; कोटी लिंगार्चन ही विशेष बाब' पू.श्रीमद शंकराचार्य नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज

‘शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे श्रद्धेने केलेल्या पूजनाने भगवंताची कृपा होते; कोटी लिंगार्चन ही विशेष बाब’ पू.श्रीमद शंकराचार्य नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज

कोटी लिंगार्चन सोहळ्याचा विशेष आनंद आहे. कोटी म्हणजे लोकांचा समज होतो की प्रकार, मात्र शिंगणापूर येथे जी पूजा होते, ती संख्यात्मक आहे. इतकी मोठी दिव्य साधना ह्या संस्थेकडून होते याचा विशेष आनंद आहे. हे लिंगार्चन म्हणजे वैशिष्ट्य आहे. महादेव हे आशुतोष आहेत. अल्प संतुष्ट आहेत. त्यामुळे अधिक परिश्रम न घेता देखील आपल्याला त्यांच्या कृपेचा आनंद वर्षाव होतो. भगवान शंकर थोडे पूजेने संतुष्ट होतो. याच सातत्याने होणे आवश्यकता असून श्रद्धेने केलेल्या उपासनेने निश्चित फळ मिळते. पुण्याचा मोठा ठेवा हा उपसनेने भाविकांना मिळणार आहे. धर्म रक्षणाकरता आपण सर्वांनी सक्षम असणे आवश्यकता. स्वामीजींनी व्यसनापासून अखिल समाजाने दूर जावे, व्यसनपासून दूर जाणे म्हणजे प्रभू शंकर यांच्या जवळ जाणे, असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केलं.

तीर्थक्षेत्र फाउंडेशनच्या वतीने पू. श्रीमद शंकराचार्य नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज यांच्या पादुकांची पूजन श्री शेखर मुंदडा आणि श्रीमंदार बडवे यांनी तीर्थक्षेत्र फॉउंडेशनच्या वतीने केले. यावेळी मोहन बडवे, अनिल बडवे, अजित बडवे, नागेश बडवे, ओंकार बडवे व अक्षयमहाराज भोसले, मुकुंद शिंदे , गणेश बाकले मान्यवर उपस्थितीत होते. यामध्ये उपस्थितीत भाविकांना रोज लक्ष भोजन दिवसभर प्रसाद उपलब्ध आहे. आलेल्या सर्व भाविकांची उत्तम सोय संस्थेने केली आहे.

मुख्य पुजारी :- श्री नागेश श्रीहरी बडवे

