दिन विशेष

मुलींनी आपल्या अंतरीक धैर्यबळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी – महेश इंगळे

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये जागतिक महिला दिन साजरा.

मुलींनी आपल्या अंतरीक धैर्यबळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी – महेश इंगळे

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये जागतिक महिला दिन साजरा.


आज शिक्षणाच्या माध्यमातून समाजात तळागाळातील अनेक मुलीही सुशिक्षित होत आहेत. कारण स्त्री शक्तीला आत्मसंयम,
आत्मधैर्याचे प्रचंड बळ स्वामींनी दिलेले आहे. आज सावित्रीबाई फुलेंची प्रेरणा घेऊन अनेक मुली विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन देश व जगभरात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याप्रमाणे आपल्या व अन्य महाविद्यालयातील मुलीही साविञिबाई फुले, मदर तेरेसा, अंतराळाविर कल्पना चावला यांची व त्यांच्या कार्यासारखी मोठी प्रेरणा घेऊन शिक्षण घेत मुलींनी आपल्या आंतरिक धैर्यबळावर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व कै

कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. आज जागतिक महिला दिनानिमित्त कै.इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेस व कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील सर्व स्टाफचे पुष्पगुच्छ देऊन महेश इंगळे यांनी स्वागत केले. यावेळी महेश इंगळे व महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते केक कापून व विद्यार्थ्यांना इंगळे यांनी केक भरवून जागतिक महिला दिनाचा आनंद द्विगुणीत केला. याप्रसंगी उपप्राचार्य पवार सर, खिलारी सर, पाटील मॅडम, करोटी मॅडम, शिराळ मॅडम, पोतदार मॅडम, कांबळे मॅडम, ममनाबाद मॅडम, जहागिरदार मॅडम, कोळी मॅडम, लवटे मॅडम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व स्टाफ उपस्थित होते.

फोटो ओळ – जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थिनी केक कापताना व उपस्थित सर्व मान्यवर व सर्व विद्यार्थिनी दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button