ग्रामीण घडामोडी

के.पी.गायकवाड प्रतिष्ठान कार्य कौतुकास्पद उपसरपंच कमलाकर सोनकांबळे

के.पी.गायकवाड प्रतिष्ठान कार्य कौतुकास्पद उपसरपंच कमलाकर सोनकांबळे

के.पी.गायकवाड प्रतिष्ठान कार्य कौतुकास्पद उपसरपंच कमलाकर सोनकांबळे

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील वागदरी येथील के.पी.गायकवाड प्रतिष्ठान कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सिद्धार्थ सोशल फाऊंडेशन संस्थापक तथा गोगांवचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी व्यक्त केलेकेवळ आलेल्या अपंगाना मदतीचा हात व प्रसाद वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झालेले शिक्षक शिवानंद गोगाव म्हणाले की, श्याम बाबर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिष्ठान तालुक्यात उत्तम सामाजिक कार्य करीत आहे. गावातील पर्व पालखी उत्सव व यात्रा दरम्यान, सामाजिक जाणिवेने भाविकांची सोय व्हावी म्हणून प्रतिष्ठानचे सदस्य आपल्या जीप मार्फत अक्कलकोट-वागदरी ही मोफत प्रवास सेवा आयोजित करतात. दरवर्षी राहुल गायकवाड यांचा वाढदिवस सार्थकातेने आणि भव्य पद्धतीने साजरा केला जातो. ग्रामस्थांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. वागदरीचे तंटामुक्त समितीचे ग्राम समितीचे अध्यक्ष शरणप्पा मंगणे, सामाजिक कार्यकर्ते संजय सुरवसे व शरण सुरवसे, प्रतिष्ठान बद्धल गौरावोद्घार काढले. यावेळी गावातील एकूण 30 अपंगांना आर्थिक मदत देण्यात आली. कोरोनाच्या काळात पोलीसमित्र म्हणून काम केलेल्या गंगुबाई कुंबळे, ललिता भटारे, महानंदा वमने, जगदेवी मुरली व महादेव सोनकवडे यांच्यासह गावातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थीताना दाल-चावल वाटप करण्यात आले. गोगावाच्या माजी सरपंच प्रदीपा जगताप अध्यक्षस्थानी होते मंचावर किरनळी सरपंच सतीश कणमुसे, पोलीस हवालदार बीपीना सुरवसे, अजय भोसले, सलीमा पीरजादे, एएसआय राठोड, उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी, लक्ष्मण भैरमडगी, मंत्री शिवराज पोमाजी, भाजप युवा नेते बसवराज शेळके, सुनिल सावंत, शिवाजी सावंत, श्याम बनसोडे , जिल्हावाहतूक शाखेचे बी.टी.राठोड, येळणूरे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष श्याम बाबर, उपाध्यक्ष मकबुल कणमुसे, ग्रामपंचायत सदस्य पंकजा सुतार, जीपमालक-चालक संघटनेचे बाबुराव जावळकोटी, बसवराज वरनाळे, परमेश्वर मातोळी, परमेश्वर मुंजाळे, मुत्तन्न चिणमगेरी, लक्ष्मण सपुरे, शंकर भाले, शंकर बटगेरी, विजयकुमार गायकवाड, आदी उपस्थित होते. अनिल सनमुख, बजरंग बाबर, अनिल पुरंत, शिवा चिणमगेरी, अस्लम मुल्ला, परमेश्वर शटगुंडे, धानलिंग अळगे, रमेश कणमुसे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. महादेव सोनकवडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष श्याम बाबर यांनी आभार मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button