शैक्षणिक घडामोडी

विद्यार्थ्यांनी कै.बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिक्षण घ्यावे – डिसले गुरुजी

डिसले गुरुजींनी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला दिली सदिच्छा भेट.

विद्यार्थ्यांनी कै.बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिक्षण घ्यावे – डिसले गुरुजी

HTML img Tag Simply Easy Learning    

कै.बाळासाहेबांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन करून व्यक्त केले मनोगत.

HTML img Tag Simply Easy Learning    

डिसले गुरुजींनी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनला दिली सदिच्छा भेट.

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२०/३/२०२३)
कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे हे एक मुरब्बी व दुरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या समितीवर विश्वस्त व चेअरमनपदी काम करत असताना त्यांची तळमळ आत्मसात करण्यासारखी होती. देवस्थानचे धर्मकार्य सांभाळतच तालुक्यात तंत्रशिक्षणाचा पाया रोवण्यात त्यांची तळमळ कामी आली.
अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागात अनेक पालकांची मुले प्रतिकूल परिस्थितीमुळे इच्छा असूनही तंत्र शिक्षण पासून वंचित राहत असल्याचे त्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या तंत्रशिक्षणाची विचारधारा आत्मसात करून या तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मिती केल्याने आज येथे विद्यार्थ्यांकरीता तंत्रशिक्षणाची सोय झालेली आहे. त्यांच्या या कार्याने ग्रामीण मुलांना तंञशिक्षण घेण्यास अनमोल अशी मदत होत आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी कै. बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून शिक्षण घ्यावे असे मनोगत अंतरराष्ट्रीय ग्लोबल शिक्षक पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच कै. बाळासाहेबांच्या पुण्यस्मरणा निमित्त येथील कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयास सदिच्छा भेट देऊन कै.बाळासाहेबांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डिसले गुरुजी बोलत होते. यानंतर त्यांनी महाविद्यालयाची चौफेर पाहणी करून आनंद व्यक्त केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, उपप्राचार्य विजय पवार, परमशेट्टी सर, ग्रंथपाल निंबाळकर सर, शिवशरण अचलेर, मनगुळे, बंटी नारायणकर, मनोज इंगोले, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले आदीजण उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – डिसले गुरुजींचा महाविद्यालय कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे प्राचार्य नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button