जुनी पेन्शनच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संपाबाबत समन्वय समितीकडून तहसीलदारांना निवेदन
निवेदन

जुनी पेन्शनच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या संपाबाबत समन्वय समितीकडून तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट:- महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय संघटने तर्फे पंचायत समिती अक्कलकोट येथे जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून बेमुदत संप व धरणे आंदोलन केले जात आहे. संपाचा आज सातवा दिवस गाजला तो आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून व थाळी नाद आंदोलन करून ..

दररोज दहा ते दोन या कालावधीमध्ये पंचायत समिती परिसर एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणेने दुमदुमत आहे.

संपाच्या पहिल्या दिवशी 14 तारखेपासून अक्कलकोट तालुक्यातील सर्व कर्मचारी संपावर जात असल्याबद्दल अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, संपाच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समिती येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपला शासनाविरुद्धचा आक्रोश तळमळीने मांडला. तिसऱ्या दिवशी शासनाने काढलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाजगीकरणाच्या शासन निर्णयाची होळी संतप्त कर्मचाऱ्यांनी केली. 19 तारखेला सोलापूर येथे कर्मचारी महामोर्चा मध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून आपला आक्रोश निदर्शनास आणून दिला.

या बेमुदत संपामध्ये अक्कलकोट तालुक्यातील शासकीय निमशासकीय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना व पदाधिकारी, कर्मचारी व मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले आहेत.
