श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सव, स्वामी दर्शनाने समाधान लाभले – बाळा खामकर
बाळा खामकर, सुरेश देशपांडे, किशोरसिंह माने-पाटील यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सव, स्वामी दर्शनाने समाधान लाभले – बाळा खामकर

श्री स्वामी समर्थ महाराजांचे १४५ वा पुण्यतिथी महोत्सव सुरुवात असल्याने या कालावधीत अक्कलकोटला येऊन स्वामी दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिरात निर्माण झालेले धार्मिक व प्रसन्न वातावरण, या काळात घडलेले स्वामी दर्शन याचे समाधान एक आगळी वेगळी अनुभूती देणारी आहे. या स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव कालावधी तील स्वामी दर्शन समाधान लाभणारे असल्याचे मनोगत मुंबईतील सुप्रसिद्ध गणेश मंडळ लालबागच्या राजाचे माजी अध्यक्ष बाळा खामकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी बाळा खामकर, सतीश खामकर, लालबागचे वेशभूषाकार रुपेश पवार, जितेंद्र मेहता, अक्षय कदम, प्रिया कदम, रूपा शिकलगार, स्नेहा वंजारे, गणेश घोरपडे, व सहकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी अकलूजचे किशोरसिंह माने-पाटील, गोंदवलेकर महाराज देवस्थानचे विश्वस्त सुरेश देशपांडे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – बाळा खामकर, सुरेश देशपांडे, किशोरसिंह माने-पाटील यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
