दिन विशेष

श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था संचलित श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी

विविध कार्यक्रम संपन्न

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*येथील श्रीसंत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था संचलित श्रीसंत सेना महाराज पुण्यतिथी महोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्रीसंत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, सायं.7 वा.हनुमान भजनी मंडळ बणजगोळ यांचा भजन, रात्रो 10.वा. देविदास जगताप, दिनकर अवताडे, एकनाथ शिंदे यांचा जुगलबंदी भारुडाचा जागर कार्यक्रम संपन्न झाला.*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सोमवारी सकाळी 9 वा.ह.भ.प.किर्तनकार अरुंधती गवळी यांचा किर्तनाचा कार्यक्रम, तद्नंतर विक्रमवीर रक्तदाते अभिजीत लोके यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे शुभारंभ, दु.12.05 मि. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रभाकर सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजन केले होते. यादरम्यान सुमारे 60 जन रक्तदाते रक्तदान केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, नागु कुंभार, शुभम मडिखांबे, माजी नगरसेविका ज्योती जरीपटके, नाभिक महामंडळ प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी जमदाडे, पो.ना.नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी शहर अध्यक्ष लक्ष्मण विभुते, उपाध्यक्ष राजेश कोरे, सचिव महेश सुरवसे, खजिनदार प्रविण राऊत, पंच पद्माकर डिग्गे, सुदर्शन विभुते, प्रभाकर सुरवसे, भागवत विभुते, सोमनिंग सुरवसे, नाभिक समाज ता.अध्यक्ष शिवशरण सुरवसे, श्रीशैल सुरवसे, व्यंकट विभुते, अनिल वाघमारे, सुमित डिग्गे, काशिनाथ विभुते, जगन्नाथ वाळके, दादा वाळके, हरी राऊत, संदीप राऊत, अमर सुरवसे, आकाश सुरवसे, सोनल सुरवसे, प्रशांत विभुते, अमोल सुरवसे, सचिन लोखंडे, गणेश विभुते, नरसिंग क्षीरसागर, शिवा विभुते, सचिन विभुते, संकेत विभुते, समर्थ विभुते, अरुण विभुते, वैभव शेटे, मनोज डिग्गे, संजय चिकले, सचिन धोत्रे, आनंद वाघमारे, श्रीकांत राऊत, बाळासाहेब वाळके, सहदेव वाघमारे, बापू काळे, सुधाकर सुरवसे, अनिल कोरे, निरंजन क्षीरसागर, किरण भाले, महादेव भाले, महेश घाटे, गणेश डिग्गे तसेच वागदरी, मैंदर्गी, दुधनी, भुरिकवठे, शिरवळ येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष सुरवसे तर आभार शिवशरण सुरवसे यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button