श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासकडून स्वामी भक्तांना होत असलेली महाप्रसादाचे सोय उत्तम दर्जाचे असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी सिने कलाकार आनंद इंगळे…
कलाकार शिरीष जोशी, ऋतुजा देशमुख, शहाजिरी जोशी, सुलेखा तळवलकर, राहुल मेहंदले, डॉ.व्यंकटेश मेतन, वीणा मेतन, सिध्दारम सक्करगी यांच्या देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे न्यासकडून स्वामी भक्तांना होत असलेली महाप्रसादाचे सोय उत्तम दर्जाचे असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी सिने कलाकार आनंद इंगळे…
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून स्वामी भक्तांना होत असलेली महाप्रसादाचे सोय उत्तम दर्जाचे असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी सिने कलाकार आनंद इंगळे यांनी केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले सहकुटुंब असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत कलाकार शिरीष जोशी, ऋतुजा देशमुख, शहाजिरी जोशी, सुलेखा तळवलकर, राहुल मेहंदले, डॉ.व्यंकटेश मेतन, वीणा मेतन, सिध्दारम सक्करगी यांच्या देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अँड.संतोष खोबरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अभियंता अमित थोरात, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाबूशा महिंद्रकर, अतिष पवार, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
