अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले स्वामी कार्य वडोदरा जिल्ह्यात देखील पोहचल्याचे मनोगत श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र व वडोदरा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी योगेश कापसे यांनी व्यक्त केले.
उपजिल्हाधिकारी योगेश कापसे

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले स्वामी कार्य वडोदरा जिल्ह्यात देखील पोहचल्याचे मनोगत श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र व वडोदरा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी योगेश कापसे यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले स्वामी कार्य वडोदरा जिल्ह्यात देखील पोहचल्याचे मनोगत श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र व वडोदरा जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी योगेश कापसे यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते स्वामींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत बेळगावचे उपजिल्हाधिकारी माधव गीते, प्रसन्न हत्ते हे उपस्थित होते.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अभियंता अमित थोरात, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, विराज माणिकशेट्टी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, देवराज हंजगे, शरदराव भोसले, शावरप्पा माणकोजी, शिवू काळे, विनायक तोडकर, सागर याळवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.