वटवृक्ष मंदिर परिसराच्या पदस्पर्शाने जीवन धन्य झाले.
नाट्य कलाकार आनंद इंगळे यांचे मनोगत.

वटवृक्ष मंदिर परिसराच्या पदस्पर्शाने जीवन धन्य झाले.

नाट्य कलाकार आनंद इंगळे यांचे मनोगत.

(प्रतिनिधी अक्कलकोट,दि.९/४/२३) – श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हे जीवनाचे परम भाग्य तर आहेच, परंतु ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत व त्यांचे निवास असलेले वटवृक्ष मंदिर परिसराच्या पदस्पर्शाने जीवन धन्य झाले असल्याचे मनोगत प्रसिद्ध मराठी सिने कलाकार आनंद इंगळे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आपले कुटुंब व सहकलाकारांसोबत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कलाकार आनंद इंगळे व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी इंगळे बोलत होते. पुढे बोलताना नाट्यकलाकार इंगळे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील भव्य गाभारा सुशोभीकरण व मंदिरातील अत्याधुनिक सोयी सुविधा पाहता जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत मंदिर समितीच्या कार्याचा आढावा पोहोचत आहे असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी आनंद इंगळे यांचे सहकलाकार परिवार शिरीष जोशी, ऋजुता देशमुख, साजिरी जोशी, सुलेखा तळवलकर, राहुल मेहंदळे, डॉ.व्यंकटेश मेतन, विणा मेतन, सिद्धाराम सक्कर्गी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, विपुल जाधव, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – आनंद इंगळे व सह कलाकारांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
