स्वामी भक्तांना नाविन्यपूर्ण सोयी-सुविधा आणि सेवा देण्याचे कार्य न्यास करीत असून, अन्नछत्र नावाचा स्वामी रुपी वटवृक्ष उभारत असल्याचे मनोगत राज्याचे वस्तू व सेवा कर दक्षता विभागाचे उपआयुक्त अनूप जाधव
उपआयुक्त गणेश पाटील यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांना नाविन्यपूर्ण सोयी-सुविधा आणि सेवा देण्याचे कार्य न्यास करीत असून, अन्नछत्र नावाचा स्वामी रुपी वटवृक्ष उभारत असल्याचे मनोगत राज्याचे वस्तू व सेवा कर दक्षता विभागाचे उपआयुक्त अनूप जाधव, मुंबई यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याचबरोबर उपआयुक्त गणेश पाटील यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, मल्लिनाथ कोगणुरे, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार, शिवू स्वामी, मंगेश कुलकर्णी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
