दिन विशेष

मंगळवारी परंपरेप्रमाणे साजरा होणार स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा.

मूळस्थान वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे महाप्रसाद, पालखी सोहळयाचेही आयोजन.

मंगळवारी परंपरेप्रमाणे साजरा होणार स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा.

स्वामी पुण्यतिथीच्या पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांना अनन्यसाधारण महत्त्व.

मूळस्थान वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे महाप्रसाद, पालखी सोहळयाचेही आयोजन.

श्रीशैल गवंडी-अक्कलकोट, — येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान म्हणजे ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान होय. या पार्श्वभूमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामींचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा मंदिर समितीच्या वतीने मोठया उत्साहाने भक्तीभावात संपन्न होत असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. यंदा श्री स्वामी समर्थांचा १४५ वा पुण्यतिथी सोहळा असून या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिनांक ७ एप्रिल २०२३ मागील ११ दिवसांपासून नित्यअनुष्ठान, धर्मसंकीर्तन, पारायण, भजन, अखंड नामवीणा सप्ताह इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, ते नियमितपणे वेळेवर संपन्न होत आहेत. मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा प्रमुख दिवस आहे.
श्री स्वामी पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता श्रींची काकड आरती होईल. तदनंतर श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण होईल. पहाटे ३ ते ५ या वेळेत नगर प्रदक्षिणा पार पडेल. देवस्थान व अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र पहाटे ४ ते ६ या वेळेत करण्यात येईल. सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या भजनाने अखंड नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा सकाळी ६ वाजता देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात होईल. स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक भावीकांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता बंद ठेवण्यात येतील. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. सकाळी ११ वाजता पुरोहित व मंदीर समितीची महानैवेद्य आरती, ११:३०वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजेसाहेब यांच्या हस्ते श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत मंदिराच्या पुर्वेकडील उपहारगृहात सर्व स्वामी भक्तांना पारंपारिक भोजन महाप्रसाद आयोजीत केले आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत कोल्हापूर येथील महाद्वार स्वामी सेवा भजनी मंडळ यांची भजनसेवा देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल. सायंकाळी ५:३० ते रात्री १० या वेळेत श्रींचा सजविलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा वटवृक्ष मंदिरातून निघेल. पालखी मार्ग फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ, समाधी मठ, परतीचा मार्ग बुधवार पेठ, कारंजा चौक, दक्षिण पोलीस स्टेशन समोरून मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, गुरू मंदिर, भारत गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली असे असेल. वटवृक्ष मंदिरात रात्री १० वाजता पालखी सोहळा आल्यानंतर देवस्थानच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना शीरा प्रसाद वाटप करणेत येईल. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदीराच्या बाहेर स्वामी भक्तांची रांग लागल्यास दर्शन रांगेची राजे फत्तेसिंह चौकापर्यंत एकेरी लाईनचे कापडी मंडप मारून विशेष सोय करण्यात येणार आहे.
या पाश्वभुमीवर स्वामी भक्तांना पादत्राण कक्षाची (चप्पल स्टँड) ची सोय देवस्थानच्या मुरलीधर मंदिर समोरील परिसरात करण्यात येईल. दिनांक १९ एप्रिल वार बुधवार रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत मंदिरात गोपाळकाला होवून श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल. दिनांक २० एप्रिल वार गुरुवार रोजी देवस्थानच्या मुरलीधर मंदीरात सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, भजनकरी, विणेकरी, प्रभात फेरीस येणारे भाविक, पारायणास बसलेले भाविक, देवस्थान कर्मचारी, सेवेकरी, सर्व पोलीस कर्मचारी यांना दुपारी १२ ते ३ या वेळेत श्रम परिहार-भोजन महाप्रसाद देण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा, पालखी सोहळा सेवेचा, व प्रसादाचा लाभ घेवून आपले जीवन स्वामी सेवा सहवासाने कृतार्थ करुन घ्यावे असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button