श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी महाप्रसादलयात अत्याधुनिक पध्दतीचे बसविण्यात आलेल्या सिंफनी कंपनीच्या ‘एअर कुल्ड सिस्टिम’ व दोन ‘ब्ल्यू स्टार’ कंपनीच्या वॉटर कुलर या मशीनचे पूजन करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी महाप्रसादलयात अत्याधुनिक पध्दतीचे बसविण्यात आलेल्या सिंफनी कंपनीच्या ‘एअर कुल्ड सिस्टिम’ व दोन ‘ब्ल्यू स्टार’ कंपनीच्या वॉटर कुलर या मशीनचे पूजन करण्यात आले.

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांना न्यासाकडून विविध सोयी-सुविधा उपलब्द करून देण्यामध्ये राज्यात अग्रेसर असून, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी महाप्रसादलयात अत्याधुनिक पध्दतीचे बसविण्यात आलेल्या सिंफनी कंपनीच्या ‘एअर कुल्ड सिस्टिम’ व दोन ‘ब्ल्यू स्टार’ कंपनीच्या वॉटर कुलर या मशीनचे पूजन करण्यात आले.

दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थाने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, पालखी संयोजक दत्ताभाऊ शिंदे, सचिन बुरुड राशिवडे कोल्हापूर, विश्वस्त संतोष भोसले यांच्यासह स्वामी भक्तांच्या उपस्थितीत ‘एअर कुल्ड सिस्टिम’चे पूजन करण्यात आले.

सदरचे सिंफनी कंपनीचे ‘एअर कुल्ड सिस्टिम’ हे २५ हजार एस.एम.एच चे असून अश्या सहा मशिन्स आहेत. महाप्रसादलायाच्या आतील वरील बाजूस २२ गेज, जि.आय. डक्टींग असून त्याची लांबी ११४ फुट आहे. या अत्याधुनिक ‘एअर कुल्ड सिस्टिम’ मशीनमुळे सध्याच्या बाहेरील वातावरणपेक्षा महाप्रसादलयातील १० ते १५ डिग्री सेल्सिअसने कमी होण्यास मदत होणार आहे.

या ‘एअर कुल्ड सिस्टिम’ मशीनमुळे महाप्रसाद गृहात थंड वातावरण निर्माण होत असून, सध्याच्या उष्णतेचे प्रमाण पाहता गरज ओळखून स्वामी भक्तांच्या सेवेर्थ सदरच्या यंत्रणे बरोबरच दोन ‘ब्ल्यू स्टार’ कंपनीच्या वॉटर कुलर या मशीनचे देखील पूजन करून, न्यासाकडून कार्यान्वित करण्यात आली आहे. न्यासाच्या या उपक्रमाबद्दल स्वामी भक्तातून स्वागत व समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, अभियंता अमित थोरात, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शुभम भिंगे, गोविंदराव शिंदे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते